सार्वजनिक बागांच्या विकासावर निधीची उधळपट्टी

अनिल अगावणे
गुरुवार, 21 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : शनिवार पेठेतील कै डॉ. वा. द. वर्तक (वनस्पतीशास्त्रज्ञ) उद्यान आहे. या उद्यानात नुकताच हिरवळीसाठी खर्च करण्यात आला. पाच ते सहा महिने हिरवळीच्या कामकाजा मुळेबस-उठ, चालणे-फिरणे याला पायबंद घालण्यात आला, परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी हिरवळ अदृश्यच झाली आहे. अशाच प्रकारे प्रवेशद्वारालगत पहिली लोखंडी कमान आहे. ती अजूनही वीस-पंचवीस वर्षे चांगली राहील. तरी सुद्धा त्याच्या पुढे अजून एक नवीन वाळूमिश्रीत खडीने कमान उभी करण्यात आली आहे. तिची सजावट झाडाच्या बुंध्या सारखीनक्षीदार केली आहे. परंतु ही कमान किती दिवस टिकणार हा मात्र संशोधनाचा विषय आहे. 

नागरिकांना बागेत जाताना-येताना अडचण येऊ नये, म्हणून स्टीलचे खांबबसविण्यात आले आहेत परंतु ते आत्ताच हालत असल्यामुळे कोणत्याही वेळेस पडून भंगारात जातील. सर्व सामान्य नागरिकांच्या घामाचा व कष्टाचा पैसा कसा वाया जाईल व आपली तिजोरी कशी भरली जाईल, हेच उद्धिष्ट यातून साध्य होत आहे. नाहक नको त्या कामावर खर्च करून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठीनागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. तेव्हाच यावर अंकुश राहील. कारभारी बदलले पण कारभारात मात्र सुधारणा नाही त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचा विश्वास सत्ताधारी पक्षावर राहिला नाही. जी आमिषे, प्रलोभने, भ्रष्टाचार, आश्वासने दिली ती अशा नको त्या कामांवर पैसा खर्च करून पूर्ण होणार आहेत का??? याचा विचार सत्ताधारी पक्षाने केला पाहिजे.नागरिकांच्या कराचा पैसा योग्य विकास कामांसाठीच खर्च केला पाहिजे.
 

Web Title: public garde waste of money