रस्ता कॉंक्रिटकरणाचे काम अर्धवट

शिवाजी पठारे 
Tuesday, 27 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कोथरूड-मयुर कॉलनीतील मुख्य रस्ता कॉंक्रिटकरणाचे हे काम जानेवारी २०१८ मध्ये सनराज कन्स्ट्रक्शन मार्फत सुरू करण्यात आले होते. हे काम ९ महिन्यांपासून पूर्ण करण्याची मुदत होती. मुदत संपल्यानंतरही निम्मे काम अपूर्ण आहे.

आता एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी दोन मोठ्या शाळा असल्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिकांना त्रास होत असून या त्रासाची ना महापालिकेला, ना ठेकेदाराला, ना लोकप्रतिधींना कोणालाच काळजी नाही. ज्या नागरिकांनी दिलेल्या करांवर यांचे अर्थकारण चालते त्यांनाच कोणीही वाली नाही. आता तरी महापालिका दखल घेऊन हे काम त्वरीत पूर्ण करून नागरिकांची त्रासातून मुक्तता करेल काय?
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road concrete work is incomplete