सकाळ संवादच्या बातमीची महापौरांनी दखल 

विजय अडागळे
गुरुवार, 21 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील (पुणे)कालव्यावरील खचलेल्या रस्त्याचा बातमी आणि व्हिडीओ सकाळ संवादद्वारे 20 जुनला प्रसिध्द करण्यात आले. या बातमीची दखल घेऊन माजी नुकतीच महापौर नगरसेवक प्रशांत जगताप यांनी पाहणी केली. या ठिकाणी लवकरच सरंक्षण भिंत बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या प्रश्नी आवाज उठवणारे विजय अडागळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन दळवी, प्रमोद कवडे-पाटील यावेळी उपस्थित होते.

हा रस्ता जागोजागी खचलेला आहे. तसेच येथे पथदिवेही नसल्याची माहिती त्यांनी जगताप यांना दिली. त्यावर सरंक्षण भिंत आणि पथदिवे उभारण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, त्यात स्कूल बसची संख्याही खूप जास्त असल्याने मुलांसोबतच सर्वांच्याच जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सदर प्रश्नाची दखल वेळीच दखल घेतल्याबद्दल सकाळ आणि प्रशासनाचे आभार. सरंक्षण भिंत  उभारण्याचे काम लवकरच सुरु होईल ही अपेक्षा.

कालव्याला सरंक्षण भिंत नाही

Web Title: sakal news impact mayor looking in matter