सत्य कहाणी... 

सुनेत्रा विजय जोशी 
गुरुवार, 8 मार्च 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या...

सांगत नाही तुम्हांस मी ही कथा जुनी पुराणी. 
आजच्याच युगातील स्त्रिची आहे ही सत्य कहाणी... 
कुणी साधना आमटे प्रकाशाच्या वाटेवरती साथ देते
गावस्कर रेणु वेश्यांच्या मुलांना शिक्षणाचा हात देते
पिडीतांच्या अन उपेक्षितांच्या डोळ्यातील पुसती पाणी.. 
सकपालांची निराधार सिंधू होते अनाथ लेकरांची माई
कल्पना चावला विज्ञानाच्या सामर्थ्याने अंतराळी झेप घेई
त्यांच्या उत्तुंग यशाची होती जगात अजरामर गाणी... 
किती नारी अशा तुम्हांस सांगु नाही नावांची गणती
प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवून जळते सामर्थ्याची पणती
नानाविध गुण असे असती प्रत्येक स्त्रिच्या ठिकाणी.... 
अबला स्वतःस समजू नका जाणुन घ्या अंगीच्या कला
कर्तुत्वाने जगुनी स्वतः करा बळकट समाजात स्त्रीशक्तीला
सोडून जावी जगातुन जातांना कर्तुत्वाची एक निशाणी.. 
 

Web Title: Sunetra Joshi writes in Esakal Citizen Journalism