पाणी चोरीमुळे पाण्याचा अपव्यय

मिलिंद मोरे
Wednesday, 12 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  विमाननगर येथील गिगा स्पेसच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरील दुभाजकामधील पाईलाईनचा गैरवापर होत आहे. दुभाजकामध्ये असलेल्या रोपट्यांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकलेली असते. त्यातून या झाडांना पाणी पुरवठा केला जातो. पण येथील खाद्यापदार्थ विक्रेते पाईपलाईन कापुन पाण्याचे कॅन भरतात.

पाणी चोरीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. कापलेल्या पाईपलाईनमधील रस्त्यावर देखील पाणी वाहते. त्यामुळे रस्ते निसरडे होत असून अपघाताची शक्यता आहे. कित्येक लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तातडीने या विरोधात कारवाई करावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water wastage due to water theft