"एलआयसी'कडून ग्राहकांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन "एलआयसी'ने पॉलिसीधारकांना सध्याच्या पॉलिसीचा हप्ता 15 एप्रिलपर्यंत भरण्याची मुदत दिली आहे.

मुंबई - भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (एलआयसी) पॉलिसीधारकांना दिलासा देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन "एलआयसी'ने पॉलिसीधारकांना सध्याच्या पॉलिसीचा हप्ता 15 एप्रिलपर्यंत भरण्याची मुदत दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एलआयसीकडून पॉलिसीधारकांना घरातच राहण्याची विनंती करण्यात येत असून, कार्यालयात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पॉलिसीधारक https://licindia.in/Home/Pay-Premium-Online या लिंकवर क्‍लिक करून ऑनलाइन माध्यमातून हप्ता भरू शकणार आहेत. 

coronavirus : वाढवा तुमची रोगप्रतिकारशक्ती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The LIC has given the policy holders a deadline to pay the policy premium by April 15