coronavirus : वाढवा तुमची रोगप्रतिकारशक्ती

डॉ. अश्‍विनी जोशी 
मंगळवार, 24 मार्च 2020

सुदृढ व्यक्ती अनेक जंतुसंसर्गांवर मात करू शकते; परंतु काही कारणास्तव ही शक्ती कमी झाल्यास संधीसाधू जंतू आपल्यावर आघात करतात आणि आपण आजारी पडतो. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण पोषक आहार घेणे गरजेचे आहे. 

जंतुसंसर्गावर मात करण्यासाठी शरीराची जी नैसर्गिक शक्ती आहे, तिला रोगप्रतिकारशक्ती म्हणतात. सुदृढ व्यक्ती अनेक जंतुसंसर्गांवर मात करू शकते; परंतु काही कारणास्तव ही शक्ती कमी झाल्यास संधीसाधू जंतू आपल्यावर आघात करतात आणि आपण आजारी पडतो. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण पोषक आहार घेणे गरजेचे आहे. 
 

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) स्वच्छ धुतलेली फळे, हिरव्या भाज्या, सॅलड्‌स, दूध, दही, ताक, घरी शिजवलेले अन्न यांचे सेवन करावे. दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी प्यावे. सुयोग्य आहारातील व्हिटॅमिन्स आणि प्रथिनांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. "व्हिटॅमिन सी'युक्त फळे उदा. लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा घ्यावे. 

2) रात्रीची 6 ते 8 तास झोप पूर्ण केल्यास उत्साही वाटते. 

3) रोज किमान अर्धा तास मोकळ्या हवेत व्यायाम करावा, व्यायामामुळे शरीर बळकट होते. 

राज्यात संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमाही बंद 

4) भारतीय संस्कृतीमध्ये वैयक्तिक स्वच्छतेला खूप महत्त्व दिले आहे, मग ते अन्न शिजवणे असो अथवा सेवन करणे असो. 

5) प्रत्येक वेळेस साबणाने स्वच्छ हात धुतल्यास जंतुसंसर्ग टाळता येतो, नैसर्गिक विधीनंतरदेखील हात साबणाने धुवावेत. 

6) सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, मद्य यामुळे श्वसनक्रिया आणि पचनक्रियांवर दुष्परिणाम होतो. परिणामी आजारपणामध्ये फुफ्फुसे, यकृत आणि पचनसंस्था कोलमडतात. याचबरोबर ज्यांना इतर काही आजार असतील जसे- 
अनियंत्रित मधुमेह, मूत्रपिंड विकार, यकृताचे आजार, केमोथेरपी चालू असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

7) मानसिक ताणतणावांमुळे आजारांवर मात करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती कमी होते. मनाने दुर्बलता आल्यास रोगप्रतिकार कठीण होऊन बसतो. स्वस्थ मन स्वस्थ शरीर. 

8) भारतीय स्वयंपाकामध्ये नियमितपणे वापरले जाणारे मसाल्याचे पदार्थ उदा. हळद, हिंग, दालचिनी, आले, लसूण, कढीपत्ता, काळी मिरी, लवंग, तुळस इत्यादी केवळ स्वादासाठी नसून, त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे वापरले जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr ashwini joshi article about increase huminity

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: