Coronavirus : ही सहा राज्य सद्य:स्थितीत सर्वाधिक सुरक्षित, येथे नाही कोरोना

No Corona Patient In This State
No Corona Patient In This State

औरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जनजीवन विस्कळीत झाले. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेची चिंता वाढली आहे. प्रत्येकाला स्वतःची, कुटुंबाची काळजी लागली आहे. देशातील आतापर्यंत २२ राज्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले; पण सहा अशी राज्य आहेत की जिथे आतापर्यंत एकही एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे ही राज्य सध्या देशातील सर्वाधिक सुरक्षित समजली जात आहेत. 


 
कोणती आहे ती राज्य 

कोरोना विषाणूपासून होणाऱ्या कोवीड-१९ या आजाराने देशातील २२ राज्यांत शिरकाव केला; पण सध्या झारखंड, आसाम, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम, नॅगालॅण्ड आणि त्रिपुरा ही सहा राज्य कोरोनापासून कोसो दूर आहेत. नाही म्हणायला या ठिकाणी काही संशयित आढळले होते; मात्र त्यांच्या लाळेची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी या सहा राज्यांनीही संपूर्ण खबरदारी घेतली असून, सीमा लॉक केल्या आहेत. संपूर्ण आरोग्य तपासणी करूनच या राज्यात बाहेर राज्यातून आलेल्यांना प्रवेश दिला जात आहे. उपाययोजना म्हणून इथेही लॉकडाऊन आहे. नागरिक घरांमध्ये आहेत. बाजारपेठेतील उलाढाल बंद झाली आहे. 



पर्यटन व्यवसायावर परिणाम 

आसाम, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम, नॅगालॅण्ड आणि त्रिपुरा या राज्यांत उन्हाळ्यामुळे पर्यटकांची संख्या वाढते. बाहेर देशातून, राज्यातून येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील अनेकांना रोजगार मिळाला आहे; पण गेल्या आठवडाभरापासून पर्यटक येणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. 


 
देशातील परिस्थिती आहे अशी 

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या देशात ७५३ जण कोवीड-१९ चे रुग्ण आहेत. त्यापैकी ६७ जण बरे झाले तर १८ जणांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण केरळ आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात आहेत. कालच्या तुलनेत देशभरात आज १८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रातील १३५ रुग्णांपैकी १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (ता. २७ मार्च) राज्यात नवे राज्य रुग्ण आढळले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. 
  
संबंधित बातम्या - 
Coronavirus : प्रादुर्भाव वाढतोय, पण आली एक दिलासादायक बातमी, वाचा... 

आरोग्य मंत्री राजेश टोपे आज म्हणाले 

  • राज्यात सध्या १३५ बाधित रुग्ण आहेत. आतपर्यंत ४,२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या. त्यापैकी ४,०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझिटिव्ह आले. 
  • शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्मावारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा
  • देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे. 
  • कोरोना व्यतिरिक्तही अन्य आजारांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू राहणे आवश्यक आहे. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज
  • असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नका. संचारबंदीच्या काळातही पोलिस आवश्यक ते सहकार्य करतील. 
  • राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलियाच्या
  • रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदी काळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबिरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश
  • देण्यात आले आहेत. रक्तदान शिबिरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
  • ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबधित रुग्ण बरे होत आहेत. 
  • बाधित रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसिंग नंतर त्यांची टेस्टिंग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि
  • उपचार या त्रिसूत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे. 
  • नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

  •  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com