Video : 'लॉकडाऊन' असले तरी काय फिटनेसशी 'नो कॉम्प्रोमाईज' !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

लॉकडाऊनमुळे सर्वच ठिकाणी असलेल्या जीम सध्या बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे आरोग्याविषयी अधिक काळजी असणाऱ्यांना वर्कआऊट शिवाय 21 दिवस कसे घालवावे याचा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊनचा दुसरा दिवस आणि यावर पर्याय म्हणून फिटनेस प्रेमींनी आता इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून आपापल्या मित्रांना वर्कआऊट चॅलेंज देत एक अनोख्या पद्धतीने व्यायाम करण्यासाठी भाग पाडलंय.

पुणे : लॉकडाऊनमुळे सर्वच ठिकाणी असलेल्या जीम सध्या बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे आरोग्याविषयी अधिक काळजी असणाऱ्यांना वर्कआऊट शिवाय 21 दिवस कसे घालवावे याचा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊनचा दुसरा दिवस आणि यावर पर्याय म्हणून फिटनेस प्रेमींनी आता इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून आपापल्या मित्रांना वर्कआऊट चॅलेंज देत एक अनोख्या पद्धतीने व्यायाम करण्यासाठी भाग पाडलंय.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊन नाही तर 'फिटनेस अब भी जारी'चा जोश कायम ठेवत 25 वर्षांचा सागर होगडे याबाबत म्हणाला, "रोजचा तीन तासांचा वर्कआऊट केल्यानंतर मी इतर काम करतो. खरं तर फिटनेसच्या बाबतीत मला कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रेमाईज केलेले आवडत नाही. देशासाठी 'थ्रोबॉल' खेळत असल्याने मला व्यायाम हा करावाच लागतो. लॉकडाऊनचा निर्णय ऐकताच 21 दिवस जिमला जाता येणार नाही कल्पना आली. त्यामुळे वर्कआऊट कसा करायचा याचा विचार करत होतो. पण मग माज्यासारख्या इतरांना सुद्धा या अडचणी असतील त्याचं काय ? असे विचार करत असताना ही भन्नाट कल्पना सुचली. वॉटर बकेट चॅलेंज, ईमोजी चॅलेंजसारख्या गोष्टी वारंवार इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोचते व त्यात लोकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात असतो. यातच थोडा बदल करत मी इन्स्टाग्राम, फेसबुकचा वापर करत माझा वर्कआऊटचा एक व्हिडियो टाकला व लिहले की 'जर तुम्ही देखील हे केले, तर तुमचा व्हिडियो मी पोस्ट करेल'. मग काय हे देखील तितकंच चांगल्या प्रकारे 'वायरल' झाले. एका पाठोपाठ मला अनेक व्हिडियो यायला सुरुवात झाली."

 

वर्कआऊट संदर्भातील आपला पर्याय सांगताना पूजा नेगी म्हणाली, "आताच कुठे वजन कमी करण्यासाठी जिम लावली होती. मोजून 13 दिवसच झाले होते आणि आता घरात व्यायाम करणे शक्य नाही. पण टिकटॉकवर असलेल्या ट्रेंडला पाहता मला देखील वाटलं की हे शक्य आहे. अगदी सहजपणे मी आणि माझे पती घरातच वर्कआऊटचे व्हिडिओ तयार करतो आणि टिकटॉकवर पोस्टही करतो. गमतीची गोष्ट तर ही आहे की याला चांगला प्रतिसाद मिळत आहे". 

Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने रद्द !

देशात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची प्रसाराला थांबविण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत असताना, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 'लॉकडाऊन'च्या निर्णयानंतर नागरिकांमध्ये मात्र चिंता निर्माण झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावली होती. पुढील 21 काय तर, तब्बल 30 दिवस पुरेल अशी सामानाची खरेदी करून ठेवली. पण 21 दिवस घरातच राहीन काय काय करायचे याची सुरुवात झाली ती बुधवार पासून जेव्हा लॉकडाऊनचा पहिला दिवस उजाडला. 

"मॉडेल्लिंग करत असल्याने नेहमी आपले वजन नियंत्रीत ठेवावे लागते. म्हणून मला जिम हाच पर्याय आहे, कारण नियमितपणे फक्त ठराविक डायट फॉलो करणे शक्य होत नसते. डायट बरोबर व्यायाम देखील तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे सध्या मी घरीच योगा करतो, त्याचबरोबर इतर व्यायामही." - हेरंब वाळके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no compromise with fitness in lockdown