Coronovirus : आता मुलांच्या परिक्षा कधी होणार ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आढवड्यात पहिली ते सहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे पास करण्याची सूचना केली होती.

बेळगाव - कोरोनामुळे विविध परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून शिक्षण खात्याने गुरुवारी पत्रक जाहीर केले. दहावी, सातवी ते नववी व आरटीआय व इतर प्रवेश प्रक्रियेबाबत 21 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती दिली आहे. त्यामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या असून 2020 - 21 च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवातही विलंबाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आढवड्यात पहिली ते सहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे पास करण्याची सूचना केली होती. तर काही दिवसांनी सातवी ते दहावी पर्यंतच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली होती. कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने 14 एप्रिल पर्यंत देशभरात लॉकडाउनचा आदेश दिल्याने आता सर्वच परीक्षा वेळेत घेणे शक्य होणार नसल्याने शिक्षण खात्याने 21 एप्रिल नंतर परीक्षा व प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात अशी माहिती दिली आहे. तसेच सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवेश प्रक्रिया राबविली जाऊ नये अशी स्पष्ट सूचना केली आहे. 

वाचा - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लागण कोणाला ही नाही

4 मार्चपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेचा इंग्रजी विषयाचा एक पेपर शिल्लक आहे. त्यामुळे बारावीची परीक्षाही अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच लॉकडाऊन मुळे 14 एप्रिल नंतर इंग्रजी विषयाचा पेपर व पेपर तपासणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने यावेळी परीक्षा आणि प्रवेश प्रकिया लांबणीवर पडल्याने परीक्षा कधी सुरू होणार याची चिंता विध्यार्थ्यांना भेडसावू लागली आहे. तसेच देशावरील कोरोनाचे संकट लवकर नष्ट व्हावे आणि 21 एप्रिलनंतर परीक्षा सुरळीतरित्या सुरू व्हाव्यात अशी प्रार्थना विध्यार्थी व पालक करू लागले आहेत. 

कोरोनाचे संकट फार मोठे आहे त्यामुळे विध्यार्थी किंवा अन्य कोणालाही त्रास होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने परीक्षांबाबतचा निर्णय परिस्थिती पाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे.  - ए.बी.पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona completely collapsed the schedule for various exams