घाबरण्याचं कारण नाही : लॉक डाऊनमध्येही मिळणार 'या' सुविधा 

टीम ई-सकाळ
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी करायची नाही. तरीही लोक जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

मुंबई Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठच्या सुमारास देशाला संबोधित करताना, 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली. त्यांच्या निवेदनानंतर देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पंतप्रधान मोदी यांनी जीवनावश्यक वस्तू, औषधे मिळणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही अनेक शहरांमध्ये धान्य खरेदीसाठी दुकानांमध्ये झुंबड उडाली. त्यामुळं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवनाश्यक सुविधा मिळणार आहेत. नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असं आवाहन राज्यातील जनतेला केलंय. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी करायची नाही. तरीही लोक जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. भाजीपाल्यासाठी गर्दी करत आहेत, हे चुकीचे असल्याने प्रशासनाने आता खबरदारी घ्यायला सुरवात केली आहे. त्यामुळं आरोग्यमंत्री टोपे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत, नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. अन्न-धान्य आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ नये, यासाठी शहरांमध्ये प्रभागनिहाय नियोजन करण्यात येणार आहे. प्रभागातील नगरसेवक, स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि दुकानदार यांच्या याद्या बनवून त्या प्रभागातील नागरिकांना त्या परिसरातील दुकानातूनच घरपोच माल देण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रशासन तयारी करत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या सुविधा मिळणार

 • धान्य, कडधान्य, तेल, डाळी 
 • औषधे आणि इतर आरोग्य सुविधा 
 • भाजीपाला आणि दूध 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

 • लोकांनी सूचनांचे पालन करावे 
 • राज्यात सहा महिने पुरेल इतका धान्यसाठा
 • रेशनवर कोट्यानुसार धान्य मिळणार 
 • नागरिकांनी गोंधळू जाऊ नये 
 • भाजी पाला धान्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये 
 • स्वतःचे सरंक्षण करणं हिच महत्त्वाची सेवा
 • कोरोनाची बाधा झालेल्यांना माणुकीची वागणूक द्या
 • पुणे-मुंबईतील चाकरमान्यांना गावी न घेण्याचा प्रकार करू नका

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्त्वाची सूचना 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजी खरेदीसाठी सध्या ज्या भाजी मंडई आहेत, त्याच्या बाजूला असणारे गल्ली आणि बोळ यामध्ये विखरून बसण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन भाजी विक्रेत्यांमध्ये वीस ते पंचवीस फुटांचे अंतर असायल हवे. लोकांनी एकाच विक्रेत्याकडे गर्दी न करता विखरून राहायला हवे, तरच या विषाणूचा फैलाव थांबणार आहे. दुधाची व्यवस्था नागरिकांना आहे त्याच ठिकाणी उपलब्ध होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lock down 21 days essential commodities information marathi