coronavirus : राज्यात आणखी 22 रुग्ण वाढले; आता रुग्णांची संख्या 200वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

राज्यात कोरोनाबाधीत आणखी २४ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात रुग्णांची संख्या २०५ झाली असून आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

पुणे - राज्यात कोरोनाबाधीत आणखी २४ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात रुग्णांची संख्या २०५ झाली असून आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य खात्यात गेल्या चोवीस तासांमध्ये आढळलेल्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. त्या अंतर्गत नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे आहेत तर दोन रुग्ण पुण्याचे आहे. नागपूर येथील ३, नगरचे दोन आणि सांगली, बुलडाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आत्तापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. 

Coronavirus : कोरोनामुळं हे बेस्ट झालं; 'या' शहरांनी घेतला मोकाळा श्वास

राज्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल के ई एम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती कोरना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलडाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोना मुळे झाला तेदेखील मधुमेही होते. राज्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे. 

राज्यात ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत चार हजार २१० जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी तीन हजार ४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत ३५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७ हजार १५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra updates total patients crossed 200 mark