अजित पवार आरबीआयच्या निर्णयावर समाधानी; परंतु, केली 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

  • रिझर्व्ह बँकेने कर्वसुली स्थगितीसाठी ‘सल्ल्या’ऐवजी सर्व बँकांना व वित्तीय संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत.
  • उपमुख्यमंत्री वित्त मंत्री अजित पवार यांची मागणी.

मुंबई : कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले असले तरी त्यांनी आणखी काही मागण्याही केल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

धक्कादायक ! कोरोनापासून बरे झालेल्यांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा लागण

‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रिझर्व्हं बँकेकडून हे निर्णय अपेक्षितच होते. राष्ट्रीय, खाजगी, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांनी त्यांची कर्जवसुली तीन महिने थांबवण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI should give clear instructions to all banks and financial institutions to postpone EMI