Corona Virus : महाराष्ट्रात १५ नवीन रुग्ण; एकूण १२२ कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

राज्यात आढललेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबई येथील सात रुग्ण असून, सांगली, इस्लामपूर येथील प्रत्येकी पाच, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेलमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे.  या नवीन बाधित रुग्णांपैकी  सांगलीचे ५ रुग्ण हे  मंगळवारी बाधित आढळलेल्या ४ रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
 

पुणे : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी १५ रुग्णांची नोंद बुधवारी आरोग्य खात्यात झाली.  त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १२२ झाली आहे.
 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात आढललेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबई येथील सात रुग्ण असून, सांगली, इस्लामपूर येथील प्रत्येकी पाच, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेलमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे.  या नवीन बाधित रुग्णांपैकी  सांगलीचे ५ रुग्ण हे  मंगळवारी बाधित आढळलेल्या ४ रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुड न्यूज; देशातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त

नवी मुंबईतील ५७ वर्षीय पुरुष हा यापूर्वी करोना बाधित आढळलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या फिलीपाईन नागरिकाच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कामोठे – पनवेल इथे आढळलेला ३८ वर्षाचा पुरुष हा त्रिनिदाद येथे गेला होता तर मुंबईतील अनुक्रमे २७ व ३९ वर्षाचे दोन पुरुष रुग्ण हे अमेरिका आणि संयुक्त अमिर अमिरात या देशांमध्ये प्रवास करुन आले आहेत. इतर ५ रुग्ण हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत.
कल्याण डोंबवली परिसरातील २६ वर्षाच्या तरुणाने तुर्कस्थानचा प्रवास केलेला आहे. 

तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा !

जिल्हा / मनपा .........................    बाधित रुग्ण    
    पिंपरी चिंचवड मनपा ...........    १२    
    पुणे मनपा    .................... १८    
    मुंबई ....................  ४८    (३ मृत्यू)
    सांगली .................... ९    
    नवी मुंबई , कल्याण डोंबिवली .................... ६    
    नागपूर, यवतमाळ .................... प्रत्येकी  ४    
    अहमदनगर, ठाणे.................... प्रत्येकी ३    
    सातारा, पनवेल    प्रत्येकी .................... २    
    उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण ................ प्रत्येकी १ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total 122 and new patients infected by corona in the maharashtra