वादग्रस्त ट्विटनंतर अमिताभ यांचे नवे ट्विट; आता मात्र जनजागृती 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना व्हायरस संदर्भात आक्षेपार्ह ट्विट करून वाद ओढवून घेतलेले महानायक अमिताभ बच्चन आता कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी यासाठी एक जाहिरात केली असून, व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केलाय.

मुंबई : कोरोना व्हायरस संदर्भात आक्षेपार्ह ट्विट करून वाद ओढवून घेतलेले महानायक अमिताभ बच्चन आता कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी यासाठी एक जाहिरात केली असून, व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केलाय. टीव्हीवर ही त्यांचा हा जनजागृती करणारा व्हिडिओ दिसू लागला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महानायक अमिताभ बच्चन यांनी कारोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी जनजागृती करणार व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. 'द  लॅन्सेट' यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वच्छता अभियानची जनजागृती करणारी ही एक जाहिरात आहे. यामध्ये त्यांनी नागरिकांना 'आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. उघड्यावर शौच करू नका. घरात ज्या माश्या असतात त्यांच्यापासून देखील कोरोना विषाणू पसरतो. रोज नियमितपणे आपले हात धुवत रहा व घराबाहेर पडू नका.' कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांचं हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitabh Bachchan new tweet