coronavirus: अभिनेता संजय दत्तही एक हजार गरजु कुटूंबांना पूरवणार जेवण

sanjay
sanjay

मुंबई- कोरोनामुळे तळहातावर पोट असणारे कामगार आणि गरजूंना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्या जीवनावश्यक वस्तुंसाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. केंद्र तसेच राज्य सरकार गरजूंना वेळोवेळी मदत करत आहे. त्याचबरोबरीने सामाजिक संस्था, उद्योजक, राजकीय मंडळी, कलाकारही आर्थिक तसेच अन्नधान्याची मदत करण्यास पुढे आले आहेत. अशातच अभिनेता संजय दत्तनेही गरजुंना अन्नदान करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी एकजुटीने लढायला हवे असेही त्याने म्हटले आहे.

आज देशात बऱ्याच लोकांना एक वेळच्या जेवणासाठीही धडपड करावी लागत आहे. अशा लोकांसाठी संजय खंबीरपणे उभा राहिला आहे. जवळपास 1000 कुटुंबियांना संजुबाबा जेवण पुरवणार आहे. 'सावकर शेल्टर्स' या संस्थेमार्फत तो ही मदत करत आहे. बोरीवली, बांद्रा भागातील गरजूंच्या जेवणाची व्यवस्था संजयकडून करण्यात आली आहे. संजयने एकमेकांना मदत करण्याचे आवाहन देखील केले आहे.

संजय म्हणतो, आपल्या संपूर्ण देशावर ओढावलेलं हे गंभीर संकट आहे. एकत्र येऊन आपण एकमेकांना मदत करणं फार गरजेचं आहे. आपल्या घरातही आपण सोशल डिस्टंसिंग पाळून देशाला मदत करु शकतो. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत माझ्यापरीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी करत आहे. तसेच 'सावकर शेल्टर्स' ही संस्था या काळात गरजुंना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. मी त्यांचा आभारी आहे.'

संजय सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. आताही त्याने मदतीची तयारी दर्शवली आहे. 'आताच्या परिस्थितीमध्ये लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. हे खरंच चांगली गोष्ट आहे. अभिनेता संजय दत्तने केलेली मदत देखील इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.' असे सावरकर शेल्टर्सचे अध्यक्ष रुपेश सावरकर यांनी सांगितले. कलाविश्वातील सारीचं मंडळी एकापाठोपाठ मदत करण्यास पुढे येत आहेत.

sanjay dutt pitches in to feed 1000 families

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com