coronavirus: किंग खाननंतर पत्नी गौरीने दिला मदतीचा हात..९५ हजार गरिबांपर्यंत पोहोचवलं जेवण

srk
srk

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे..दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे..या कठीण काळात अनेकजण मदत करताना पाहायला मिळत आहेत..सेलिब्रिटी देखील या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांच्यापरिने अनेक वेगवेगळ्या प्रकारची मदत सरकार आणि जनतेला करत आहेत...किंग खान शाहरुख देखील यात पुढे सरसावल्यानंतर आता पत्नी गौरी खानने देखील गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे..

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानने कोरोना व्हायरसच्या संकटात लढण्यासाठी एक महत्वाचं योगदान दिलं आहे..निर्माती गौरी खानने माहिती दिलीये की, कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये सध्या मुंबईतील गोर-गरिब कठीण परिस्थीतून जात आहे..आत्तापर्यंत अशा ९५००० लोकांना जेवण वाटलं गेलं आहे..सोशल मिडियावर गौरीच्या या योगदानांच नेटकरी कौतुक करत आहेत..

गौरी खानने तिच्या मीर फाऊंडेशनची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, रोटी बँक फाऊंडेशनने मीर फाऊंडेशनच्या सहयोगाने मुंबईतीला गोर-गरिबांना ९५००० जेवणाची पॅकेट्स उपलब्ध करुन दिली आहेत..ही तर अजुन सुरुवात आहे ..यापुढे अजुन खूप अशी कामं केली जाणार आहेत..अशा प्रकारे गौरी खानने मीर फाऊंडेशनद्वारा या संकटकाळात केल्या जाणा-या उल्लेखनीय कामाची माहिती दिली आहे..

याआधी शाहरुखने देखील त्याच्या मदतीचा लेखाजोगा सादर केला होता..शाहरुखने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल सरकारला अघोषित रक्कम दान देण्यासाोबतंच कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी आणखी ब-याच वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे..नुकतीच शाहरुखने महाराष्ट्रात डॉक्टरांसाठी २५००० पीपीई किट्स देखील देणार असल्याची घोषणा केली होती..शाहरुख आणि गौरीने त्यांच्या मालकिच्या कंपन्यांद्वारे आणि फाऊंडेशनद्वारे कशा प्रकारे कुठे कुठे मदत केली जाईल याची योग्यप्रकारे माहीती दिली होती.. 

shah rukh khan wife gauri khan distributes 95000 meals amid coronavirus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com