शाहरुख खान पुन्हा मदतीसाठी सज्ज..डॉक्टरांसाठी २५००० पीपीई किट्सचं वाटप करणार

srk
srk

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे..सामान्य माणूस असो किंवा मग सेलिब्रिटी प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत..अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे मदत करताना दिसत आहेत..बॉलीवूडचा किंग खान शाहरुख देखील कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करण्यासाठी पुढे येत आहे..याआधीही शाहरुखने मदत जाहीर केली होती आणि ती मदत कोणत्या प्रकारे कशी करण्यात येईल या लेखाजोगा देखील मांडला होता..आता पुन्हा एकदा शाहरुख मदतीसाठी सज्ज झाला आहे..

कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत..मात्र देशात सध्या पीपीई किट्सची कमतरता असल्याचं मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे..अशातच शाहरुख खानने मदतीचा हात पुढे करुन डॉक्टरांसाठी २५ हजार पर्सनल पोटेक्टीव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्स महाराष्ट्रात दान करणार असल्याची घोषणा केली आहे..

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी ट्वीट करत शाहरुख खानने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत..त्यांनी ट्वीट करत लिहीलं आहे, '२५ हजार पीपीई किट्स दिल्याबद्दल शाहरुख खान तुमचे खुप खुप आभार..ही मदत कोरोनाच्या या लढाईत पुढे खुप कामी येईल..आणि आमच्या मेडिकल टीमला सुरक्षित राहण्यासाठी खुप उपयोगी पडेल..'

शाहरुख खानने ट्वीट केलंय ज्यात त्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना रिप्लाय देत त्यांचे आभार मानले होते..त्याने ट्वीटमध्ये लिहीलंय, 'किट आणण्यासाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद..मानवता राखण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत..'

याआधीही शाहरुख खानने कोरोनाच्या लढाईत लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे..त्याने ही मदत वेगवेगळ्या प्रकारे दिली आहे..शाहरुख आणि पत्नी गौरी खान यांच्या मालकिच्या वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे या मदतीचं नियोजन करण्यात आलं होतं..

shah rukh khan donates 25000 ppe kits in fight against covid 19  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com