esakal | मुंबईकरांचे भविष्य 'त्या' 402 प्रवाशांच्या हाती 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus 402 foreign travelers crucial for city mumbai maharashtra

परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या निकटच्या सपंर्कात असलेल्या व्यक्तींनाच आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईकरांचे भविष्य 'त्या' 402 प्रवाशांच्या हाती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई Coronavirus : परदेशातून आलेल्या 402 जणांना 14 दिवस "होम क्वारंटाइन' करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून बंद करण्यात आली असल्याने नवीन प्रवासी येणार नाहीत. त्यामुळे कोरोना रोखण्यात हे 402 प्रवासी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईचे भविष्य अवलंबून आहे. ते स्वतःची प्रकृती कशी जपतात?, ते घरात स्वतः कसे राहतात?, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाणार नाहीत ना? या सगळ्या शक्यतांवर मुंबईचं भवितव्य अवलंबून आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांवर जबाबदारी
परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या निकटच्या सपंर्कात असलेल्या व्यक्तींनाच आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला घरात सक्तीने एकांतात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या ओळखता याव्यात यासाठी त्यांच्यावर हातावर "होम क्वारंटाइन'चा शिक्का मारण्यात आला आहे. त्यानंतरही काही जण सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. त्यामुळे धोका वाढण्याची भीती आहे. मुंबईतील रुग्णालयांत 156 संशयित देखरेखीखाली आहेत. त्यांचा बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क येणे अवघड आहे, तर 402 जण "होम क्वारंटाइन' आहेत. त्यांनी नियम पाळले तर हा आजार पुढे पसरू शकणार नाही. या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. 

आणखी वाचा - परदेशातून आलेल्यांना घरापर्यंत ड्रॉपची सोय

14 दिवसच का? 
कोरोनाच्या विषाणूची संख्या मानवी शरीरात 14 दिवसांत वाढते. सुरुवातीला या आजाराची लक्षणे दिसत नसली तरी, विषाणू शरीरात असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या काळात ही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यास त्यांना संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रवाशांना 14 दिवस एकांतात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. 

आणखी वाचा - कोरोनालाही एसी प्रचंड आवडतो, तुमचा एसी बंद ठेवा

लोकलसेवा बंद
मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल सेवेचा उल्लेख केला जातो. पण, आता आज रात्रीपासूनच मुंबईची लोकलसेवा बंद करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलंय. त्यामुळं ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, भाईंदर, वसई, विरार येथून चाकरमानी मुंबईत येऊ शकणार नाहीत. मु्ंबईतली ये-जाच बंद होणार आहे. उपनगरीय लोकल रेल्वेतून रोज जवळपास 65 ते 70 लाख प्रवासी प्रवास करतात आता लोकल सेवाच बंद केल्यामुळं खासगी कंपन्यांची कार्यालये बंद राहणार आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणांवर होणारी गर्दी थांबणार आहे.

loading image
go to top