कोरोनालाही AC प्रचंड आवडतो, त्यामुळे तुम्ही तुमचा AC बंदच ठेवलेला बरा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

  • कोरोनाचे विषाणू हे थंड हवेत किंवा गारठा असेल तिथे जास्त काळ जिवंत राहतात
  • हे विषाणू थंड वातावरणात वेगानं पसरण्याचा धोका असतो

मुंबई : संपूर्ण भारत कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात तब्बल ११ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२ वरून ६३ वर पोहोचला आहे. त्यातच आता राज्याचे आरोग्य मंत्री यांनी जनतेला AC चा वापर न करण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा: कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर

काय म्हणाले आरोग्यमंत्री:

  • कोरोनाचे विषाणू हे थंड हवेत किंवा गारठा असेल तिथे जास्त काळ जिवंत राहतात
  • हे विषाणू थंड वातावरणात वेगानं पसरण्याचा धोका असतो
  • त्यामुळे AC चा वापर कमी करावा 
  • घरीही खिडक्या आणि दारं उघडे ठेवा 
  • AC ऐवजी सध्या पंखाच वापरा  
  • उन्हामध्ये विषाणूची तीव्रता कमी होते त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी असतो.
  • त्यामुळे घरात सूर्यप्रकाश येऊ द्यावा.
  • याबातीत सरकारी कार्यालयातही एसीचं कुलिंग कमी ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलं आहे. 

हेही वाचा: भिंतीवर लिहिली बायकोच्या प्रियकराची माहिती,पण त्या आधीच त्यानं तिला.... 

काय सांगतात आतापर्यंतचे आकडे:

मुंबईत कोरोनाचे नवीन १० नवीन रुग्ण आढळले आहेत तसंच १ जण पुण्यात आढळला आहे. मुंबईत विदेशातून आलेले ८ रूग्ण आहेत  तर त्यांच्या संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात ११ रुग्णांची वाढ झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत आढळलेल्या ६३ रुग्णांपैकी १२ ते १४ जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर काही कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच सतर्क राहण्याची गरज आहे. 

Do not use AC at offices or at home said state health minister read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not use AC at offices or at home said state health minister read full story