esakal | COVID19 : मुंबई दुसऱ्यावरून कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीये का ?
sakal

बोलून बातमी शोधा

COVID19 : मुंबई दुसऱ्यावरून कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीये का ?

मुंबईत अशा अनेक वस्त्या आहेत जिथं मोठी लोकसंख्या दाटीवाटीने राहत असते. एकाच खोलीत चार ते पाच लोकं राहत आहेत. अशात सोशल डिस्टंसिंग किंवा क्वारंटाईनमध्ये, इतरांपासून अंतर ठेऊन राहूच शकत नाहीत.

COVID19 : मुंबई दुसऱ्यावरून कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीये का ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाची धास्ती सर्व जगात आहे. चीन मागोमाग कोरोनाने सर्व जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. अशात भारताबद्दल बोलायला गेलं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहेत. देशातील सर्वात जास्त दाट लोकवस्तीचं शहर असणाऱ्या मुंबई शहराची तुलना आता वुहानशी व्हायला सुरवात झालीये. महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत सध्याची परिस्थिती जगभरातील अनेक मोठ्या देशांच्या तुलनेत चांगली असली तरीही दिवसागणिक वाढत जाणारा कोरोनाचा आकडा मुंबई करांमध्ये धडकी भरवणारा आहे. मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला तर मात्र प्रशासनाला परिस्थिती हाताळणं कठीण होईल असं जाणकार म्हणतात. 

मोठी गुड न्यूज : १५ कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह, मिळाला डिस्चार्ज   

अशात चिंताजनक बाब म्हणजे कोरोना आता मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत मागील २ दिवसात असे काही रुग्ण आढळून आलेत जे थेट परदेशातून कोरोना घेऊन आलेले नाही किंवा जे थेट परदेशातून कोरोना घेऊन आलेल्यांच्या निकटच्या संपर्कातील देखील नाहीत. यापैकी अशाच एका परळच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झल्याची बातमी समोर येतेय. मिळालेल्या माहितीप्रमाणे परळ भागात राहणाऱ्या या महिलेचं खाद्यपदार्थांचं छोटंसं दुकान आहे. आसपासच्या भागातील अनेक लोकं या महिलेच्या दुकानात खाद्यपदार्थ घेण्यास येत असतात.    

मुंबईत अशा अनेक वस्त्या आहेत जिथं मोठी लोकसंख्या दाटीवाटीने राहत असते. एकाच खोलीत चार ते पाच लोकं राहत आहेत. अशात सोशल डिस्टंसिंग किंवा क्वारंटाईनमध्ये, इतरांपासून अंतर ठेऊन राहूच शकत नाहीत. अशात महानगर पालिकेकडून करण्यात आलेल्या सुविधा मिळेळपर्यंत अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दाट लोकवस्तीत महापालिकेकडून फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु आहे. मात्र या वस्त्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले पण अजिबात लक्षणं नसलेले अनेक रुग्ण असू शकतात. आणि म्हणूनच सरकारकडून महापालिएककडून वारंवार घरात राहण्याचं आवाहन करण्यात येतंय.

मोठी बातमी - विमानसेवा बंद होण्यापूर्वी मुंबई-दिल्ली विमानाचं तिकीट कितीला विकलं गेलं माहितीये? वाचा...

यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे मुंबईतही कोरोनाच्या स्टेजचा. स्टेज तीनमध्ये कोरोनाचा 'कम्युनिटी स्रेड' होतो, म्हणजेच लोकवस्तीत कोरोना पसरतो. अशात आपण अजूनही कोरोनाच्या दुसऱ्याच स्टेजमध्ये असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. त्यामुळे घाबरू नका, काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका.      

whats is stage of covid 19 corona virus in mumbai read full story with examples  


 

loading image