सांगलीत इस्लामपूरचे आणखी दोन कोरोना रुग्ण; कोल्हापूरच्या नातेवाईकालाही लागण

टीम ई-सकाळ
गुरुवार, 26 मार्च 2020

चार कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या कोल्हापूरच्या पेठवडगावमधील एका व्यक्तीलाही कोरोनाची झाली आहे.

सांगली Coronavirus : सांगलीत कोरोनाचे आणखी दोन रुग्ण वाढले असून, एकूण संख्या 11 झाली आहे. तर संपर्कातील कोल्हापूरच्या एक नातेवाईकालाही कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित रुग्ण मिरजेतील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधीलच आणखी दोघांना लागण झाली आहे. "त्या" चार कोरोना बाधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या कोल्हापूरच्या पेठवडगावमधील एका व्यक्तीलाही कोरोनाची झाली आहे. तर, दोघे इस्लामपूरचे असल्यानं सांगलीचा कोरोना बाधितांचा आकडा हा 11 वर पोहोचला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - घाबरू नका, देशांत मृतांचा आकडा वाढणार नाही

सांगली इस्लामपूर येथील 4 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोना लागण झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना व संपर्कात आलेल्या बारा जणांना मिरजेच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी पाच जणांना लागण झाली होती. तर, उर्वरित व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. एकूण बारा जणांचे नमुने हे सांगली आरोग्य विभागाकडून पाठवण्यात आले होते. त्यापैकी अकरा जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून, त्यामधील इस्लामपूरमधील दोन जणांना तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडगाव येथील एकाला कोरोना झाल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. या सर्व जण महिला आहेत. तरी या सर्वजणांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. सांगलीच्या इस्लामपूर येथील चौघांना सुरुवातीला सौदी अरेबियातून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्या घरातील नातेवाईकांना आणि जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus two more persons positive sangli islampur toll rises 11