Corona Virus : 'कोरोना'ची लक्षणे नाहीत, पण भितीने ग्रासले

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 11 April 2020

 'रेडक्राॅस'च्या पथकाने शुक्रवारी कॅम्प भागात न्यू मोदीखाना येथे मोफत वैद्यकीय शिबिर घेतले. त्यात सुमारे २०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर शनिवारी सोलापूर बाजार येथे शिबीर झाले, तेथेही २०० जणांना तपासले. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे भान ठेउन, सॅनिटेशन ची काळजी घेत नागरिकांची तपासणी केली. 

पुणे : 'कोरोना'ची स्थिती गंभीर होत असताना लाॅकडाऊन काळात नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर 'इंडीयन रेडक्राॅस सोसायटी'तर्फे घेण्यात येत आहेत. यात सर्दी, खोकला, ताप याची लक्षणे नसली तरी नागरिकांना 'कोरोना'च्या धास्तीने ग्रासल्याचे दिसून आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 'रेडक्राॅस'च्या पथकाने शुक्रवारी कॅम्प भागात न्यू मोदीखाना येथे मोफत वैद्यकीय शिबिर घेतले. त्यात सुमारे २०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर शनिवारी सोलापूर बाजार येथे शिबीर झाले, तेथेही २०० जणांना तपासले. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे भान ठेउन, सॅनिटेशन ची काळजी घेत नागरिकांची तपासणी केली. संस्थेचे अध्यक्ष डाॅ विक्रम पाठक, सचिव आर.वी. कुलकर्णी, मोबिन नानावटी,  सतीशचंद्र कांकरिया, डाॅ राजकुमार शहा आदी उपस्थित होते. 

Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

डाॅ. राजकुमार शहा म्हणाले, "दोन दिवसात आम्ही सुमारे ४०० जणांची तपासणी केली. यामध्ये नागरिकांना जवळ येऊ देता योग्य अंतरावरुन तपासणी केली जाते. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांना थेट सरकारी दवाखान्यात जाण्याच्या सूचना केल्या, पण त्यांचे प्रमाण खुपच कमी होते. बहुतांश नागरिकांना धुळीची अॅलर्जी, घशात थोडी खवखव आहे त्यामुळे अशा नागरिकांना आपल्याला कोरोनाच झाला अशी भिती वाटत आहे. बहुतांश नागरिकांना लक्षणे शून्य आहेत, पण भिती खुप आहे. त्यामुळे त्यांची भिती दूर करून काळजी कशी घ्यावी यावरच आम्ही भर देत आहोत. पुढील काळात लुल्लानगर, सहकारनगर यासह इतर भागात ही शिबीर आयोजित केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 8806066635 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As per medical examination by Red Cross about people has no symptoms of Corona but frightened