Coronavirus: कोरोनाच्या संकेतस्थळावर 78 हजार प्रवाशांची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कार्यान्वित केलेल्या IDSPया संकेतस्थळावर 78 हजार 425 प्रवाशांची नोंदणी झाली आहे.

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कार्यान्वित केलेल्या IDSP (आयडीएसपी) या संकेतस्थळावर 78 हजार 425 प्रवाशांची नोंदणी झाली आहे. यामध्ये परदेशी आणि देशांतर्गत प्रवास केलेल्या नागरिकांचा समावेश आहे. खासगी व्यवसाय करणाऱ्या 914 वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही नोंदणी केली आहे,'' अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सर्वाधिक 65 हजार 254 प्रवाशांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.तसेच पुणे महापालिकेच्या हद्दीतील सहा हजार 494, पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील 3 हजार 349, जिल्ह्यातील 14 नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील 2 हजार 219 आणि तीन कटक मंडळातील 336 प्रवाशांचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या एकूण प्रवाशांपैकी विमानतळ कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारी कर्मचारी आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 49 हजार 175 जणांची नोंदणी केली आहे. एकूण नोंदणीच्या हे प्रमाण 63 टक्के इतकेआहे. खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 26 हजार 406 जणांची म्हणजेच 34 टक्के प्रवासी नोंदवले आहेत. 2 हजार 844 म्हणजे तीन टक्के नागरिकांनी स्वत:हून नोंदणी केली आहे. 

हेही वाचा : पुण्यात फरासखाना, खडक, स्वारगेट व कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 78 thousand passengers registered on the website of Corona