कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता; वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडे अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

पुणे : शहरात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर  नियंत्रण ठेवून तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  ही माहिती दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडे अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. अधिष्ठाता यांनी आवश्यकतेनुसार अधिग्रहीत केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करुन घ्यावी. नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानधन अदा करण्यात येणार आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट भाजी मंडई पॅटर्न ठरतोय आदर्श
ससून रुग्णालयामध्ये रुग्ण उपचारासाठी भरती होत आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट उपचार होण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

लायगुडे रुग्णालयात सुधारणा; 'क्वारंटाईन' नागरिकांना दिलासा                         
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी पुणे शहर आणि परिसरातील अधिग्रहित केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांची नावे : 

- डॉ. भूषण किन्होलकर, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (मोबाईल क्रमांक 9822097687) 
- डॉ.सुमित अग्रवाल ,ऑस्टर ॲन्ड पर्ल हॉस्पिटल (9822886661),
- डॉ.मुकेश महाजन, श्री हॉस्पिटल क्रिटी केअर ॲन्ड ट्रामा सेंटर (9823231238)
- डॉ.श्रीपाद महाडिक पुना हॉस्पिटल (9552664589 ), डॉ.गणेश गोंगाटे, पुना हॉस्पिटल (9823219497) , डॉ.रविंद्र कुटे, पुना हॉस्पिटल (9840396455) 
- डॉ.अरुणकुमार देशमुख, नोबेल हॉस्पिटल (9423006073), डॉ.देवाशिष बॅनर्जी, नोबेल हॉस्पिटल (8766897988) 
- डॉ.रणजित देशमुख जहांगीर हॉस्पिटल (9767391703 ), डॉ.सुशिल गांधी ,जहांगीर हॉस्पिटल (9850932358) 
- डॉ.अश्पक बांगी, जीवनरेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, देहूरोड (7972700600) 
- डॉ.चेतन पाटील, एमएमएफ रत्ना हॉस्पिटल (9820267983) 
- डॉ.राखी दत्ता, साधु वासवानी हॉस्पिटल (8007200081) 
- डॉ.शेफाली चव्हाण, साधु वासवानी हॉस्पिटल (7756093545)
- डॉ.श्रीपाद कोरे, विराज हॉस्पिटल, लोणी काळभोर (8999076147)

या डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत कार्यालयीन आदेश पारित करण्यात आला आहे. 
Lockdown : ऑनलाईन सेवेद्वारे केवळ जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा होणार
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.संयोगिता नाईक आणि राजेंद्र गोळे यांची समन्वयक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री म्हणतात, परीक्षा रद्द; अन् हे मुख्याध्यापक म्हणतात, परीक्षा घेणारच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acquired the services of medical professionals due to the probability of an increase in corona infection