CoronaVirus : कोरोनाग्रस्तांवर बहिष्कार टाकल्यास सोसायटीवर कारवाई : जिल्हाधिकारी

Action on will Taked Society for Boycotting  Patient Of Corona said Collector
Action on will Taked Society for Boycotting Patient Of Corona said Collector

पुणे : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी बाधित देशांतून तसेच परदेशातून आलेल्या काही नागरिकांना आपापल्या घरी विलगीकरण करून ठेवले आहे. परंतु, त्या नागरिकांवर सोसायटीतील नागरिकांकडून बहिष्कार टाकणे आदी प्रकारचा त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. असे केल्याचे आढळून आल्यास संबंधित सोसायटीतील नागरिकांवर नाइलाजास्तव कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच अध्यक्ष आणि सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी रविवारी दिला.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुणे हे पुरोगामी लोकांचे शहर आहे. हा एक प्रकारचा फ्लू आहे. तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सोसायटीत असा कोणताही संसर्ग झालेले नागरिक असतील, तर त्यांना सोसायटीचे चेअरमन, सचिव व सदस्य यांनी विनाकारण त्रास देऊ नये अथवा बहिष्कार टाकू नये. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

पुण्यात 'या' 8 ठिकाणी संचारबंदीची शक्यता; महापालिकेचा प्रस्ताव
चीन, भारत, इटली, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ, जपान, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी मुख्यत्वेकरून कोरोनाची लक्षणे आहेत. विदेशातून आलेल्या व्यक्ती त्यांच्या घरात विलगीकरण कक्षामध्ये राहत आहेत. या व्यक्ती त्यांच्या घरात राहिल्यामुळे सोसायटीमधील इतर कुटुंबीयांना संसर्ग होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना संसर्ग झालेल्या रुग्णांना दिल्या आहेत.

संशयित रुग्ण बाहेर आढळल्यास कारवाई
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 15 वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. मात्र, काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अथवा गर्दी करणे टाळावे. काही संशयित रुग्ण अथवा संसर्ग झालेले रुग्ण आदेश देऊनही बाहेर फिरत आहेत. सामाजिक भान ठेवून त्यांनी अशा प्रकारे फिरू नये, फिरताना कोणी आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याचा इशाराही विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com