Corona Virus : 5 रुपयांत मिळणार घरपोच भाजी पोळी: चंद्रकांत पाटलांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

चंद्कांत पाटलांनी पुण्यातील त्यांच्या कोथरुड मतदारसंघात फक्त ५ रुपयात भाजी पोळू देण्याची घोषणा केली आहे. तसेच ज्यांना नियमित औषधांची गरज आहे अशा नागरिकांना 25% सवलतीच्या दरात  प्रिस्क्रिप्शननुसार औषध घरपोच दिली जाणार आहेत.

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन केला आहे. नागरिकही लॉकडॉऊनला प्रतिसाद देत घरातच राहत आहेत पण, अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे काही नागरिकांचे जेवणाचे हाल होत आहे. अशा गरजु नागरिकांच्या मदतीसाठी  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.  

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चंद्कांत पाटलांनी पुण्यातील त्यांच्या कोथरुड मतदारसंघात  फक्त ५ रुपयात भाजी पोळू देण्याची घोषणा केली आहे. तसेच ज्यांना नियमित औषधांची गरज आहे अशा नागरिकांना 25% सवलतीच्या दरात  प्रिस्क्रिप्शननुसार औषध घरपोच दिली जाणार आहेत.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास​

अशी मिळेल मदत
१ गरजू नागरिकांना 5 रुपयात घरपोच पोळी भाजी हवी असल्यास - आ चंद्रकांतदादा मदत गट 1- 8262879683 या व्हाट्सअॅप नंबरवर सकाळी 10 वाजे पर्यंत मागणी करावी. यासाठी  नाव, पत्ता व मोबीईल नंबप व्हाट्सअ्ॅप मेसेज करून नोंदणी करावी. त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच दिली जाणार आहे.  तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यास  रात्री 9 वाजेपर्यंत घरपोच देता दिली जाईल.

2. ज्यांना औषधांची गरज आहे आणि डॉक्टरांनी नियमित घ्यायला सांगितली आहेत अश्या नागरिकांना 25% सवलतीच्या दरात प्रिस्क्रिप्शन नुसार घरपोच औषध देणार आहेत. औषधसेवासाठी चंद्रकांतदादा मदत गट 2 :- 9922037062 या व्हाट्सअॅप नंबर मागणी करावी.  रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रिस्क्रिप्शन, नाव , पत्ता व नं  व्हाट्सअप्प करावे व दुसऱ्या दिवशी औषधे घरपोच दिली जातील.

 

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय

 जास्तीत जास्त नागरिकांना ही सेवा देण्यासाठी या सेवेचा लाभ फक्त गरजूंनीच घ्यावा अशी विनंती देखील केली आहे. दरम्यान, या मदतीसाठी जी माणसे धोका पत्करून हे सर्व पोहचविणार आहेत त्यांना विनासायास ये-जा करता यावी यासाठी आपण प्रशासनाला विनंती केल्याचे  चंद्कांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य हवं आहे असेही ते म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant patil Announces the deliver Food at home in 5 rupees only