Coronavirus : लॉक डाऊनसाठी आता नागरिकांचाच पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

सरकारने जारी केलेल्या लॉक डाऊनचे काही नागरिक कसोशीने पालन करीत नसल्याची बाब समोर येत असतानाच उपनगरांमध्ये आता अशा बेशिस्तांना रोखण्यासाठी रहिवासी पुढे सरसावले आहेत.

पुणे - सरकारने जारी केलेल्या लॉक डाऊनचे काही नागरिक कसोशीने पालन करीत नसल्याची बाब समोर येत असतानाच उपनगरांमध्ये आता अशा बेशिस्तांना रोखण्यासाठी रहिवासी पुढे सरसावले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घोरपडी आणि खडकी परिसरात रहिवाशांनीच कडक उपाययोजना केली आहे.
घोरपडी: घोरपडी येथील बालाजीनगरमध्ये गल्ली क्रमांक ४ येथे राहणाऱ्या नागरिकांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश बंदी केली आहे.या गल्लीच्या प्रवेशद्वारावरच प्रवेश बंदी असलेला फलक लावला आहे. इतकेच नव्हे तर दोरीच्या सहाय्याने गल्लीतील प्रवेशच बंद केला आहे. गल्लीतील नागरिकाशिवाय इतर कोणी गल्लीत प्रवेश केला तर त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, अशा आशयाचा मजकूर या फलकावर लिहिण्यात आला आहे.

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 

याबाबत बोलताना रहिवासी म्हणाले, काही नागरिकांना करोनाचे गांभीर्य लक्षात येत नाही. सकाळी व संध्याकाळी इतर गल्लीतील किंवा परिसरातील नागरिकांची ये जा सुरू होती. त्यामुळे गल्लीतील काही जाणकार नागरिकांनी गुरुवार (ता.२६) पासून गल्लीतील इतरांचा प्रवेश बंद केला आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी हे पाऊण उचलले आहे.

विविध पातळीवर सरकार, प्रशासन प्रयत्न करत असताना नागरिकांकडून अशाप्रकारे सकारात्मक प्रयत्न केला जात आहे याचे इतर नागरिकांकडूनही कौतुक केले जात आहे. घोरपडीमध्ये या फलकाची सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच चर्चा रंगली आहे.

खडकीत गर्दी टाळण्यासाठी बाकडे केले उलटे
खडकी बाजार - गर्दी टाळण्यासाठी खडकीतील गोपी चाळ येथील विकास तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही भन्नाट उपाययोजना केली आहे. मंडळाच्या गणेश मंदिराजवळ ज्येष्ठ नागरिक तसेच गणेश भक्तांना बसण्यासाठी तीन चार बाकडे लावण्यात आले होते. या बाकड्यांवर कोणीही बसू नये म्हणून हे सर्व बाकडे कार्यकर्त्यांनी उलटे करून ठेवले आहे. या संकल्पनेचे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह यांनी पाहणी दरम्यान कौतुक केले. मंडळाने इतरांना चांगला आदर्श घालून दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizenship initiative now for lock down