Coronavirus : सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास घात

cold cough fever patient
cold cough fever patient

पिंपरी - सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनात अडथळा जाणवल्यास नागरिक कोरोनाच्या धास्तीने रुग्णालयात धाव घेत आहेत. संख्या वाढल्याने या रुग्णांवर तात्पुरते उपचार करून त्यांना खासगीसह शासकीय रुग्णालयातून पिटाळून लावले जात आहे. अशा रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास घात ठरू शकतो. त्यामुळे संसर्ग आटोक्याबाहेर जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वायसीएम रुग्णालयातही चौदा दिवसांत कोरोनाची ओपीडी 463 इतकी झाली आहे. तर सर्दी, ताप, खोकल्याची दररोजची ओपीडी वायसीएम व भोसरी रुग्णालयासह शंभरी पार करत आहे. काही रुग्ण भीतीपोटी दवाखान्यात जात आहेत. काहीजण दिरंगाई करत आहेत. काही बहाद्दर माहिती लपवून ठेवत आहेत. त्याचा त्रास इतरांना होण्याची दाट शक्यता आहे.

वायसीएमचे वरिष्ठ डॉ. विनायक पाटील म्हणाले, 'खासगी रुग्णालयांनी रुग्णांची काटेकोर तपासणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच चौदा दिवसांनंतर दुर्लक्ष झाल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्याकरिता पुढील उपचारासाठी तत्काळ शासकीय रुग्णालयात रुग्ण हलविणे अपेक्षित आहे.'

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच!

वायसीएममध्ये दोन आठवड्यात 463 पैकी 156 रुग्णाचे थुंकी द्रव्याचे नमुने तपासणीसाठी दिलेले आहेत. तसेच घरोघरी आरोग्य विभागाने आतापर्यंत साडेचार लाखांच्यावर  सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येत तपासणी दरम्यान दिरंगाई झाल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय ज्यांना होम क्वारंटाईन केले त्यांना उशिराने शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे या रुग्णांकडे दुर्लक्ष झाल्यास संसर्ग प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यासाठी किरकोळ कोरोना सदृश रुग्णांवर काटेकोर लक्ष असणे अत्यावश्यक आहे.

Corona Virus : पुण्यात संपर्काशिवाय कोरोनाच्या संसर्गाचा पाचवा रुग्ण

संसर्ग आटोक्यात येण्यासाठीच आपण साखळी तोडत आहोत. रुग्णामध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळल्यास पाच ते सहा टप्प्यांत उपचार करावे लागतात. त्यासाठी होम क्वारंटाईन नियमांचे पालन गरजेचे आहे. अचूक वेळी रुग्णांमधील बदल लक्षात येणे गरजेचे आहे. कधी कधी थुंकी व म्युकर नमुन्यामध्ये त्रुटी येऊ शकतात. त्याकरिता प्राथमिक तपासण्यासाठी देखील एमडी डॉक्टर असणेच अपेक्षित आहे.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com