the fifth found patient of corona without any contact in Pune
the fifth found patient of corona without any contact in Pune

Corona Virus : पुण्यात संपर्काशिवाय कोरोनाच्या संसर्गाचा पाचवा रुग्ण

पुणे : परदेशवारी नाही तसचे, नेमक्या कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूंच संसर्ग झाला याची निश्चित माहिती नाही, अशा प्रकारचा शहरातील पचावा रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

Coronavirus : कोरोना व्हायरसचा फोटो समोर; कसा आहे कोरोना पाहाच!
रविवार पेठेत रहाणारा 51 वर्षीय पुरूष रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने उपचारांसाठी गुरुवारी संध्याकाळी खासगी रुग्णालयात दाखल झाला. त्यांना कोरोनाच्या संसर्गाची स्पष्ट लक्षणे दिसत असल्याने रुग्णालयाने त्यांच्या घशातील द्रव पदार्थाची नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री साडेआकरा वाजण्याच्या सुमारास आला. त्यात रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्या कोरोना रुग्णांसाठी राखिव ठेवलेल्या विलगिकरण कक्षातील खाटांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांची रक्तातील वाढलेली साखरही नियंत्रणात आली आहे, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकऱयांनी सांगितले.  
शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

एका सराफी पेढीमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयाला कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग नेमका कसा झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नाही, किंवा कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कातही आलेल्याची निश्चित माहिती नाही. अशा प्रकराचा हा पाचवा रुग्ण शहरात आढळला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णाच्या कुटुंबातील आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना महापालिकेच्या डाँ. नायडू रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असेही आरोग्य खात्यातील अधिकाऱयांनी सांगितले.    

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'नीट' परीक्षेस स्थगिती!

शहरात यापूर्वी संसर्गाची नेमकी माहिती नसेलल्या चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अशा प्रकारची पहिली रुग्ण 31 वर्षीय महिला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संपर्क नसलेल्या यापर्यंत कोरोनाचा संसर्ग कसा झाला, याचा तपास आता राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) घेत आहे. त्यासाठी केंद्रीय पथकानेही पुण्यातील या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com