विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'नीट' परीक्षेस स्थगिती!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

परीक्षा स्थगित केल्याने विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये, या वेळेचा अधिक चांगल्या प्रकारे तयारीसाठी करावा, असे आवाहन ही 'एनटीए'ने केले आहे.

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'नीट' परीक्षा ३ मे रोजी होणार होती. ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी 'कोरोना'च्या स्थितीचा आढावा घेऊन पुढील तारीख जाहीर केली जाणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए)मार्फत 'नीट'ची परीक्षा आयोजन केली जाते. शुक्रवार (ता.२७) पासून परीक्षा अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थांना हाॅल तिकीट दिले जाणार होते. 

- Lockdown : खाकीमधील माणुसकीचे दर्शन घडले; पदरमोड करून भरवताहेत 'पीठलं-भाकरी'!

देशात 'कोरोना'चा प्रभाव वाढत असल्याने १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे 'एनटीए'ने ३ मे रोजी होणारी प्रवेश परीक्षा स्थगित केली आहे. १४ एप्रिल रोजी देशातील स्थिती कशी आहे याचा आढावा घेऊन १५ एप्रिल रोजी हाॅल तिकीट देण्याबाबत विचार केला जाईल, असे 'एनटीए'ने स्पष्ट केले आहे.

- Coronavirus : कोरोनामुळं जगभरात लॉकडाऊन, पण पाकिस्तानात का नाही?

परीक्षा स्थगित केल्याने विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये, या वेळेचा अधिक चांगल्या प्रकारे तयारीसाठी करावा, असे आवाहन ही 'एनटीए'ने केले आहे. अधिक माहितीसाठी www.nta.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

दरम्यान, यापूर्वी 'जेईई मेन'ची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नवीन तारीख ३१ मार्च नंतर जाहीर केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते, मात्र आता या परीक्षेला देखील ग्रहण लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NEET 2020 exam postponed due to Coronavirus outbreak