कामशेतमध्ये कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या 2 फेऱया पुर्ण; 383 जण होम क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

परदेशातून आलेल्या एकाला व पुणे मुंबई येथून आलेल्या ३८३ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. ३८ गावातील १२८१९ कुटुंबाच्या कोरोना सर्वेक्षणाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

कामशेत - खडकाळा आरोग्य केंद्रासह सहा उपकेंद्रा मधील ३८ गावातील १२८१९ कुटुंबाच्या कोरोना सर्वेक्षणाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या सर्वेक्षणात परदेशातून आलेल्या एकाला व पुणे मुंबई येथून आलेल्या ३८३ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या सगळ्यांच्या संपर्कात असलेले ४२७ नातेवाईकांना देखील घर न सोडवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग बाधीत एकही रूग्ण नाही ही समाधानाची बाब आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल गिरी आणि डाॅ.सूनिल चिद्रावार यांच्या मार्गदर्शनाखाली खडकाळा सांगिसे गोवित्री करंजगाव साते वडगाव या सहा उपकेंद्रातील गावातून हे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी ४० आशा वर्कर्स, ४ आरोग्य सहाय्यक, ६ आरोग्य सेवक, २ आरोग्य सेविका, २ आशा पर्यवेक्षिका,२ वैद्यकीय अधिकारींची टीम राबत आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्याची योग्य खबरदारी , शासनाने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे करावयाचे तंतोतंत पालन,सोशल डिस्टक्शन या सह अन्य सूचना आरोग्य विभागाच्या वतीने दिले जात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete two rounds of Corona survey in Kamshet