Corona Virus : परवानगीसाठी पोलिस ठाण्यात फेऱ्या मारणारा 'तो' व्यावसायिक कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील काही भाग सील करण्यात आला आहे. मात्र, आपला व्यवसाय अत्यावश्‍यक सेवेत येत असल्याने व्यावसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी एक व्यावसायिक संबंधित पोलिस ठाण्यात गेला. परवानगीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक त्या कागदपत्रांसह ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट घेतली. 

पिंपरी : अत्यावश्‍यक सेवेतील दुकान सुरू ठेवण्यासाठी पोलिसांच्या परवानगी मिळावी. यासाठी एका व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्या. मात्र, नंतर "तो' व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पायाखालीच जमीनच सरकली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील काही भाग सील करण्यात आला आहे. मात्र, आपला व्यवसाय अत्यावश्‍यक सेवेत येत असल्याने व्यावसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी एक व्यावसायिक संबंधित पोलिस ठाण्यात गेला. परवानगीसाठी लागणाऱ्या आवश्‍यक त्या कागदपत्रांसह ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट घेतली. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास
दरम्यान, बुधवारी (ता.8) प्राप्त झालेल्या काही अहवालांमध्ये या व्यावसायिकाचा देखील अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठाण्यात व परिसरात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test is positive of businessman who walks into a police station for permission in pimpri