esakal | Coronavirus : पिंपरीत 22 पाॅझिटिव्ह; भोसरी तीन दिवस सील
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Test

दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आणखी एका व्यक्तीचा एनआयव्ही कडील अहवाल गुरुवारी पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 22 झाली आहे. दरम्यान, भोसरी गावठाण परिसर शुक्रवारपासून (ता. 10) तीन दिवस सील करण्यात येणार आहे.

Coronavirus : पिंपरीत 22 पाॅझिटिव्ह; भोसरी तीन दिवस सील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

निजामुद्दीन प्रकरणातील आणखी एक पॉझिटिव्ह 
पिंपरी - दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आणखी एका व्यक्तीचा एनआयव्ही कडील अहवाल गुरुवारी पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 22 झाली आहे. दरम्यान, भोसरी गावठाण परिसर शुक्रवारपासून (ता. 10) तीन दिवस सील करण्यात येणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निजामुद्दीन येथील कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडमधील 23 नागरिक सहभागी झाले होते. त्यातील तिघांसह संपर्कात आलेल्या पाच जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. गुरुवारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील पाॅझिटिव्हची संख्या 22 झाली आहे. त्यातील 12 जण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. 

Coronavirus : 'शांताबाई' फेम संजय लोंढे यांच्यासह लोककलावंतांना महिनाभराचा धान्यसाठा

दरम्यान, गुरुवारी 40 संशयितांचे नमुने तपासण्यासाठी घेतले आहेत. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत शहरातील एक हजार 887 व्यक्तींना घरातच क्वारनटाइन केलेले आहे. त्यातील एक हजार 318 जणांचा 14 दिवसांचा क्वारनटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. 

भोसरीत आजपासून संचारबंदी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली संचार बंदी महापालिकेकडून अधिक कडक करण्यात आली आहे. भोसरीतही एक पाॅझिटिव्ह आढळल्याने शुक्रवारपासून (ता. 10) ते रविवारपर्यंत (ता. 12) गावठाण परिसर पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. या दरम्यान, भाजीपाला, किराणा, दूध तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद  राहणार आहेत.  याची सर्व नागरिक व व्यापारी, दुकानदार यांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

loading image
go to top