धक्कादायक : बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या चार; वाचा कोणाला झाली लागण!

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 April 2020

बारापैकी आणखी तीन जणांचे अहवाल अजूनही प्राप्त झाले नसल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

बारामती Coronavirus : शहरातील भाजीविक्रेत्या कुटुंबातील एकाला काल कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज त्यांच्या कुटुंबियातील आणखी दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता चारवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याची सून व मुलगा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - जपाननं खूप उशीर केला, वाचा सविस्तर बातमी

काल समर्थनगर परिसरातील भाजीविक्रेत्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्याने तातडीने त्यांच्या संपर्कातील बारा जणांना तातडीने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज या पैकी दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. दोनच दिवसांत तीन रुग्ण सापडल्याने आता बारामतीत अधिक कडक उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्याची गरज बोलून दाखविली जात आहे. बारामतीत रुग्णांची संख्या चार झाल्यामुळे आता प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना अंमलात आणल्या जातील अशी शक्यता आहे. दरम्यान आता या कुटुंबियांच्या संपर्कात आणखी कोण आले होते, त्यांचीही तपासणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान बारापैकी आणखी तीन जणांचे अहवाल अजूनही प्राप्त झाले नसल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

आणखी वाचा - कोरोनामुळं उरकला ऑनलाईन साखरपूडा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus baramati two more got positive covid19 total affected four