Coronavirus : मार्केट यार्ड 'हे' विभाग पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

  • मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग पुढील आदेश येईपर्यंत बंद
     

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोना विषाणूंच्या वाढता धोका लक्षात घेऊन मार्केट यार्डातील सर्व संघटना आणि बाजार समिती प्रशासनाची बैठक पार पडली आहे.  यामध्ये झालेल्या चर्चेत बाजार आवारातील अडते, व्यापारी, कामगार, टेम्पोचालक यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजावर होणार परिणाम आणि कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा बटाटा व केळी बाजार शुक्रवार ( ता. १०) पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनाने संबधित संघटनांना पत्राद्वारे कळविले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील ज्या भागात पोलिसांनी कडक निर्बंध घातले आहेत. त्या भागात मार्केट यार्डातील ६० ते ७० टक्के अडते, व्यापारी, कामगार, टेम्पोचालक  राहत आहेत. या परिस्थितीत बाजारात काम करणे योग्य ठरणार नसल्याचे निवेदन बुधवारी अडते असोसिएशन आणि कामगार संघटनेकडून बाजार समितीला देण्यात आले होते. त्यांनतर बाजार समिती प्रशासन आणि मार्केट यार्डातील विविध संघटनांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर बाजार समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५लाखांवर तर, मृत्यूंचा आकडा...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा. तसेच भाजीपाला विक्रीची पर्यायी व्यवस्था बाजार समितीकडून शहरात करण्यात यावी. त्यामुळे शहरात भाजीपाल्याची टंचाई भासणार नाही. शहरात सध्या करोनाचा संसर्ग वाढत आहे. कामगार, हमाल, टेम्पोचालक करोनाचा संसर्गामुळे भयभीत झाले असून या परिस्थितीत काम करणे शक्य नाही. त्यामुळे शुक्रवार (ता. १०) पासून कामगार संघटनेचा कोणताही कामगार कामावर उपस्थित राहणार नसल्याचे कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी सांगितले.

Coronavirus: ही व्यक्ती करणार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची मदत

शहरातील ज्या भागात पोलिसांनी कडक निर्बंध घातले आहेत. त्या भागात मार्केट यार्डातील ६० ते ७० टक्के अडते, व्यापारी, कामगार, टेम्पोचालक  राहत आहेत. या परिस्थितीत काम करणे योग्य ठरणार नसल्याचे निवेदन बुधवारी अडते संघटेकडून बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांना देण्यात आल्याची माहिती अडते संघटनेचे सचिव रोहन उरसळ यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Market yard Some section completely closed until Next order

Tags
टॉपिकस