Corona Virus : लॉकडाऊनमध्ये दाम्पत्याकडून 'असा' पोलिसांना दिला जातोय आधार ! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

पोलिसांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर आल्या. त्यातील एक अडचण ही पोलिसांना रात्री नाकाबंदी नाक्यांवर चहा मिळत नसल्याचे समजले. त्यांनी त्यांचे पती संतोष यांना ही समस्या सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते राहात असलेल्या मुंढवा परिसरातील पोलिसांना चहा, पाणी दिले.

पुणे : कोरोना पासून आपल्या पुणेकरांचे जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर उभे आहेत. अनेकदा पोलिसांना जेवण तर दूरच साधा चहा, नाष्टा मिळत नाही. विशेषत: रात्री पोलिसांचीही अवस्था बिकट होते. हे चित्र पाहून एका दाम्पत्याला पाहवले नाही, मग काय त्यांनी शहरात नाकाबंदी नाक्यावरील २००-२५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मध्यरात्री चहा, पाणी व नाष्टा  पुरविण्याचे काम करत आहेत. हे कार्य सुरू आहे पदरमोड करून केवळ आणि केवळ पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ! 

Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव
संतोष सपके व भक्ती सपके असे या दाम्पत्याच्या  नाव आहे. भक्ती या "आयएसएएस इंटरनॅशनल ब्युटी स्कूल" या संस्थेच्या संस्थापक आहेत, तर त्यांचे पती संतोष हे "आयएसएएस सॉफ्टवेअर सिस्टीम" या आयटी कंपनीचे संस्थापक आहेत. आई वडील, जुई व कार्तिक ही मुले, असे त्यांचे छोटे कुटुंब.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
मध्यरात्री ड्युटी करणाऱ्या पोलिसांना देताहेत चहा, पाणी, नाष्टा
शहरात संचारबंदी सुरू असल्याच्या दुसऱ्याच दिवशी भक्ती यांना एका महिला पोलिस अधिकाऱ्याने एका समाज घटकाला मदत करण्याचे आवाहन केले. ही मदत करताना त्यांना हजारो पोलिस लोकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे असल्याचे दिसले. पोलिसांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर आल्या. त्यातील एक अडचण ही पोलिसांना रात्री नाकाबंदी नाक्यांवर चहा मिळत नसल्याचे समजले. त्यांनी त्यांचे पती संतोष यांना ही समस्या सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते राहात असलेल्या मुंढवा परिसरातील पोलिसांना चहा, पाणी दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी केशवनगर, खराडी, वडगावशेरी, रामवाडी, येरवडा, कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन पासून ते शनिवारवाडा, बुधवार पेठ इथपर्यंत पोलिसांना मध्यरात्री बारा ते पहाटे तीन या वेळेत चहा देण्यास सुरुवात केली. चहा, बिस्किटे, खाद्यपदार्थ व उपवासाचे पदार्थ पोलिसांना देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री बरोबरच दररोज सायंकाळी ही ते हा उपक्रम राबवित आहेत.

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 
पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन हा उपक्रम त्यांनी सुरू ठेवला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे सासरेही काहीवेळा त्यांच्यासमवेत येतात. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी ते पुरेपूर काळजी घेत आहेत. दररोज किमान १० ते १५ हजार रुपयांचा खर्च ते करत आहेत. केवळ पोलिसांना आपल्याकडून काही प्रमाणात आधार मिळावा म्हणून. पोलिस ही त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानू लागले आहेत. 

"शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना हजारो पोलिस आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे आहेत. त्यांना आपण किमान आधार देण्यासाठी खूप काही देऊ शकत नाही. परंतु एक कप चहा तरी देऊ शकतो. या भावनेतून आम्ही दररोज मध्यरात्री व दिवसा पोलिसांना पाणी, चहा व नाश्ता देत आहोत. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहोत."
- भक्ती सपके.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple support to Police by providing tea and snacks at midnight during lockdown