Coronavirus: पुण्यात डॉक्‍टरांची पथके घरोघरी पोहचणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींना महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचे नियोजन केले आहे.त्यासाठी 30 डॉक्‍टरांची पथके घरोघरी जाणार आहेत.

पुणे - पेठांसह काही भाग "सील' केल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने नव्याने पावले उचलली आहेत. या भागांतील रहिवाशांची तपासणी करून संशयितांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींना महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 30 डॉक्‍टरांची पथके घरोघरी जाणार आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील पेठांसह कोंढवा, गुलकटेकडी परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सर्व पेठांसह काही भाग "सील' करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत अत्यावश्‍यक सेवा वगळता नागरिकांना ये-जा करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तरीही, कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने खबरदारी म्हणून काही उपाय करण्यात येत आहेत. त्याअंतर्गंत जो भाग "सील' करण्यात आला; तेथील प्रत्येक घरांतील नागरिकांची आरोग्य तपसाणी केली जाणार असून, विशेषत: ताप, थंडी, सर्दी, खोकला आढळून येणाऱ्या नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांचे नुमने प्रयोगशाळांत पाठविले जातील. दरम्यान, हे आजार बळावण्याची शक्‍यता असलेल्या व्यक्तींवर आवश्‍यक उपचारही सुरू करण्यात येतील. त्यासाठी नागरिकांना तपासणीसाठी स्वत: पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. 

Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे; त्या ज्यांना ताप, थंडी, खोकला आहे, त्यांना घरीच विलग राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यापलीकडे जाऊन अशा लोकांना "स्वॅब' घेण्याची तयारी करण्यात आली आहे. 

मध्यवर्ती भागात कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करीत आहोत. अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्याने गैरसोय होणार नाही; पण घरीच राहून या काळात नागरिकांनीही सहकार्य करावे. 
- शेखर गायकवाड, आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors squads will arrive home to home