Coronavirus : गरजूंच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे - डॉ. दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

अन्नधान्य दान करणाऱ्यांसाठी संपर्क क्रमांक -

  • पुणे जिल्हा : भानुदास गायकवाड (जिल्हा पुरवठा अधिकारी) ०२०-२६०६१०१३, अस्मिता मोरे (अन्नधान्य वितरण अधिकारी) ०२०-२६१२३७४३. 
  • सातारा जिल्हा : स्नेहल किसवे (जिल्हा पुरवठा अधिकारी) ०२१६२-२३४८४०. 
  • सांगली जिल्हा: वसुंधरा बारवे (जिल्हा पुरवठा अधिकारी) ०२३३-२६००५१२. 
  • कोल्हापूर जिल्हा : दत्तात्रय कवितके (जिल्हा पुरवठा अधिकारी) ०२३१-२६५५७९. 
  • सोलापूर जिल्हा : उत्तम पाटील (जिल्हा पुरवठा अधिकारी) ०२१७-२७३१००३.

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्या मदतीसाठी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्जिकल मास्क आणि वैद्यकीय साहित्याची गरज आहे. अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्थांसह दानशूर व्यक्तींनी साहित्य स्वरूपात मदत करावी. मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action  या संकेतस्थळावरूनही मदत करता येईल. मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश विभागीय आयुक्त कार्यालयातही जमा करता येऊ शकतो.सामाजिक संस्था व विविध कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट, ग्लोव्हज, फेस मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- ९५ मास्क, सॅनिटायझर, गॉगल, गम बूट, सोडिअम हायपोक्‍लोराईड पाच टक्के द्रावण, फेस शील्ड, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन सिलिंडर, पल्स ऑक्‍सिमीटर यासह वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागाला गरज असल्याने पुणे विभागातील ५ जिल्ह्यांतील दानशूरांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी डॉ. संजय देशमुख (मोबाइल क्र. ९४२२०३३४३९), डॉ. नंदा ढवळे (९८२२४२८५६०), गौरी पिसे (९८९०४०८९८७), गिरीश कुऱ्हाडे (७७९८९८११९९) यांच्याशी संपर्क साधता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donors should come forward to help those in need dr deepak mhaisekar