Corona Virus : पुणे मनपाच्या नावाने फिरणारी 'ती' लिंक खोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 11 April 2020

शनिवारी (ता.११) एक लिंक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, त्यात मनपाच्या शिक्षण विभागाकडून ही लिंक तयार केली आहे. यात प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, ताप, सर्दी खोकला यांसह इतर काही आजार आहे का ?, परदेशात दौरा केला आहे का? पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक अशी माहिती ऑनलाईन भरायला सांगितले जाते आहे. ही लिंक खरी असल्याचे मानून अनेकांनी यात सर्व माहिती भरली आहे

पुणे : 'कोरोना'चे सर्वेक्षण करण्यासाठी पुणे महापालिकेने लिंक तयार केल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मात्र नागरिकांनी यात माहिती भरू नये ही लिंक फेक असल्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली जाणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
शहरात 'कोरोना' बाधितांची संख्या वाढत असल्याने शहराचा बहुतांश भाग सील केला आहे. महापालिकेने रुग्णांचा शोध घेण्यासाठी सील केलेल्या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याचा अहवाल रोज प्रशासनाला सादर केला जात आहे. जे संशयीत आहेत त्यांना वेगवेगळ्या रुग्णालय तपासणीसाठी पाठविले जात आहे.

 Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

शनिवारी (ता.११) एक लिंक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, त्यात मनपाच्या शिक्षण विभागाकडून ही लिंक तयार केली आहे. यात प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, ताप, सर्दी खोकला यांसह इतर काही आजार आहे का ?, परदेशात दौरा केला आहे का? पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक अशी माहिती ऑनलाईन भरायला सांगितले जाते आहे. ही लिंक खरी असल्याचे मानून अनेकांनी यात सर्व माहिती भरली आहे.

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 
याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "ही लिंक पुणे मनपाने तयार केलेली नाही. आम्ही अशा प्रकारे कोणतेही सर्वेक्षण करत नाही. त्यामुळे लोकांनी यात माहिती भरू नये. या विरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: False link is spread in the name of Pune Municipal Corporation to survey Corona