Coronavirus : पुण्यात शिक्षणसंस्थांच्या किचनमधून अन्न पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

'कोरोना'मुळे महाविद्यालये बंद असल्याने त्यांच्या किचनचा वापर भुकेल्यांना अन्न पुरविण्यासाठी करण्यात येणार आहे. यासाठी दलित इंडियन चेंबर्स ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) आणि पुण्यातील काही शिक्षण संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून सुमारे ७ हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुणे - 'कोरोना'मुळे महाविद्यालये बंद असल्याने त्यांच्या किचनचा वापर भुकेल्यांना अन्न पुरविण्यासाठी करण्यात येणार आहे. यासाठी दलित इंडियन चेंबर्स ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) आणि पुण्यातील काही शिक्षण संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यातून सुमारे ७ हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'च्या संचारबंदीमुळे कष्टकरी समाज अडचणीत आला आहे. अनेकांच्या घरातील किराणा संपत आला आहे, तसेच रोजगार बुडाल्यामुळे सामान खरेदीसाठी पैसेही शिल्लक नाहीत, अशी कोंडी झाली आहे. या नागरिकांना मदत करण्यासासाठी पुण्यात अनेक सामाजिक, संस्था मदतीला धावून येत आहेत. 

'डिक्की'चे अध्यक्ष मिलींद कांबळे म्हणाले, कष्टकरी समाजाची अवस्था वाईट झाली आहे, पुढील काही दिवस त्यांना पोटभर अन्न मिळाले पाहिजे. रस्त्यावर रहाणारे नागरिक, लहान मुले यांनाही जेवायला मिळत नाही. 

Coronavirus : त्या तिघांना आज घरी सोडणार

सध्या महाविद्यालयचे बंद असल्याने त्यांच्या किचनचा वापर अन्न शिजवण्यासाठी करता येऊ शकतो, त्यामुळे एमआयटी, सुर्यदत्ता ग्रुप, भारती विद्यापीठ, सिंहगड इंस्टिट्यूट या संस्थांशी चर्चा केली. त्यांनी यासाठी तयारी दर्शविली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना याबाबत सांगितल्या नंतर त्यांनी ही सुविधा पुरविण्यासाठी परवानगी दिली अाहे.  वाहतूक व कामगारांना फिरता यावे यासाठी पोलिसांकडून पासेस तयार करण्याचे काम सुरू आहे.

एमआयटीच्या कोथरूड व लोणी येथील, सुर्यदत्ताच्या बावधन येथील, कात्रज येथे भारती विद्यापीठ आणि वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इंस्टिट्यूट येथे हे अन्न तयार केले जाईल. ते महाविद्यालयाच्या बाहेर पॅकेजमध्ये 'सामाजिक अंतर' (सोशल डिस्टन्स) ठेवून वितरीत केले जाईल. काही ठिकाणी पोलिसांच्या मदतीने वस्त्यांमध्ये अन्न पुरविले जाईल. 

'डिक्की'च्या माध्यमातून धान्य पुरविले जाईल, महाविद्यालयात पोळी, चटणी, लोणचे यांचे पॅकेट तयार केले जाईल. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कोरडे अन्न दिले जाणार आहे, तसेच हाॅटेल गिरीजा व बांबू हाऊस यांनीही अन्नदानाची तयारी केली आहे, अधिक माहितीसाठी व मदतीसाठी ९८५०५४१४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food supply from the kitchen of educational institutions in pune