अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पीएमपीची मोफत बससेवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

25 ते 31 मार्च दरम्यान सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि सायंकाळी साडेचार ते साडे सहा दरम्यान पीएमपीच्या बस कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहणार आहेत.

पुणे : अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएमपीने मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 25 ते 31 मार्च दरम्यान सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि सायंकाळी साडेचार ते साडे सहा दरम्यान पीएमपीच्या बस कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहणार आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची तिकीट आकारणी करण्यात येणार नाही. त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना बसमध्ये प्रवेश देण्यात येईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसमार्ग पुढीलप्रमाणे.  1-  स्वारगेट - नांदेड सिटी - डेक्कन 2- नतावाडी- विश्रांतवाडी- मनपा 3- भेकराइ नगर- मनपा 4- विमान नगर-  मनपा 5- औंध- डेक्कन 6- कात्रज - आरटीओ- शनिवार वाडा. 

हेही वाचा : पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन

मार्गांवर ही बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यासाठी सध्या एमपीने 20 बसचे नियोजन केले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बस प्रवास मोफत मिळावा यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पीएमपीला पत्र पाठवून चर्चा केली होती, त्यानुसार पीएमपी ने हा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free PMP bus service to essential service worker

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: