#Lockdown2.0 : भूक भागविण्यासाठी रस्ता झाडणाऱ्या आजोबांना मिळाली मदत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

लॉकडाऊन मध्येही माणुसकी जिवंत असल्याचे उत्तम द्योतक पहायला मिळाले आहे." तीस रूपयांसाठी झाडला रस्ता" हे वृत्त 'सकाळ'मध्ये ऑनलाईनला गुरुवारी (ता.16) प्रसिद्ध झाले. अन्‌ आजोबांना फुल न फुलाची पाकळी मदत मिळाली.

पिंपरी - लॉकडाऊन मध्येही माणुसकी जिवंत असल्याचे उत्तम द्योतक पहायला मिळाले आहे." तीस रूपयांसाठी झाडला रस्ता" हे वृत्त 'सकाळ'मध्ये ऑनलाईनला गुरुवारी (ता.16) प्रसिद्ध झाले. अन्‌ आजोबांना फुल न फुलाची पाकळी मदत मिळाली.

Video : ...अन्‌ तीस रुपयांसाठी झाडला रस्ता

कोथरूड येथील मानसोपचार तज्ज्ञ दीपा राक्षे व निगडी प्राधिकरणातील बुक क्‍लब मधील काही महिलांनी रोख रक्कम स्वरूपात मदत केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी वाचून मदतीसाठी धाव घेतली. त्याचप्रमाणे कासारवाडीतील मातृभूमी प्रतिष्ठानच्या सदस्यांनीही जेवण पुरविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping grandparents on the road to hunger