coronavirus : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रुग्णांच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन केला आहे.त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदी लागू आहे.अनेक भागात अद्यापही त्याचे पालन होत नाही.

पुणे - भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसर सील करुनही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नागरिकांनी दाखविलेल्या स्वयंशिस्तीमुळे या विषाणूचा संसर्ग कमी असून, या परिसरात केवळ एकच रूग्ण आढळला आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवरूनही ही माहिती समोर आली आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदी लागू आहे. परंतु, शहराच्या अनेक भागात अद्यापही त्याचे पालन होत नाही. पोलिसांकडून दररोज होणाऱ्या कारवाईतून हे समोर येत आहे. शहरातील या विषाणूच्या बाधितांची संख्या 508 झाली आहे. त्यात दररोजन नव्याने भर पडत आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय बाधितांची संख्येचे विश्‍लेषण दररोज महापालिकेकडून केले जाते. महापालिकेकडून शुक्रवारी (दि.17) पंधरा क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात आलेल्या विश्‍लेषणातून ही माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात एक रुग्ण, तर त्याखालोखाल औंध आणि बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केवळ तीनच बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यावरून या परिसरातील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्याचे दिसते. त्यानंतर नगर रस्ता व वडगाव शेरीमध्ये सहा रुग्ण, त्यानंतर सिंहगड रस्ता आठ रुग्ण, वारजे कर्वेनगर आणि कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी नऊ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील या विषाणूचा प्रसार रोखण्यात नागरिकांनी मोठा हातभार लावल्याचे दिसून आले आहे.याउलट भवानी पेठ 130 रुग्ण, कसबा -विश्रामबागवाडा 63 रुग्ण तर ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 61 रुग्ण आढळून आले आहे. पुण्यातील या विषाणूचा पहिला बाधित रूग्ण सिंहगड रस्ता येथे आढळून आला होता. एक महिन्यानंतरही तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the number of corona patients Bhavani Peth Regional Office pune