#Lockdown2.0 : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील उद्योगधंदे सोमवार पासून सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्य सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी जाहीर केली होती. तिची ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढविली होती. मात्र, राज्याच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार उद्योगधंदे टप्पा-टप्प्याने सुरु करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते. त्यानुसार, आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील उद्योगधंदे सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

पिंपरी - महापालिका क्षेत्र वगळता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील उद्योगधंदे सोमवार (ता.२०) पासून पूर्ववत सुरु होणार आहेत. राज्य सरकारने त्याबाबत अधिसूचना देखील काढली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्य सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी जाहीर केली होती. तिची ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढविली होती. मात्र, राज्याच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार उद्योगधंदे टप्पा-टप्प्याने सुरु करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते. त्यानुसार, आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील उद्योगधंदे सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 

उद्योग सहसंचालक (पुणे विभाग) एस.एस.सुरवसे म्हणाले, "शासनाने यापूर्वी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पुणे विभागातील १३६५ तसेच पुणे जिल्ह्यातील ५३२ उद्योगधंद्यांना सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता, महापालिका क्षेत्र वगळता पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नसलेल्या आैद्योगिक पट्ट्यामधील उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, इंदापूर, रांजणगाव, जेजुरी, तळेगाव, कुरकुंभ, चाकण (अंशत:)च्या भागांतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्योगधंदे सोमवार (ता.२०) सुरु केले जातील.राज्य सरकारची तशी अधिसूचना देखील प्राप्त झाली आहे.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industries in rural areas of Pune district will start from Monday