Coronavirus : आयटी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्ट्यांची सक्ती; कारण...?

itemployee
itemployee

पिंपरी - कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. मात्र, काही कंपन्यांनी प्रोजेक्‍टचे काम घरातून होत नसल्याचे कारण पुढे करीत आयटी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्या घेण्याची सक्‍ती केली आहे. कंपन्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आयटी कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. त्याअगोदरच काही आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. देशात सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दरम्यान, काही कंपन्यांनी आपल्याकडे असणाऱ्या प्रोजेक्‍टचे काम घरातून होत नसल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना पगारी सुट्या घेण्याची सूचना केली आहे. सध्या असणाऱ्या लॉकडाऊनचा कालावधी 21 दिवसांचा आहे आणि आयटी कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळणाऱ्या पगारी सुट्यांची संख्या 19 ते 20 आहे. त्यामुळे आगामी काळात लॉकडाऊनमध्ये वाढ झाली तर आपला पुढील कालावधी बिनपगारी सुटी म्हणून गृहित धरण्यात येणार असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांचे पगार कापू नका, अशी सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, आयटी कंपन्यांच्या या भूमिकांमुळे सरकारकडून दिलेल्या आदेशांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. 

- पगारी सुट्यांची सक्‍ती केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ः सुमारे 1000 
- कंपन्यांची संख्या ः सुमारे 10 ते 15 

आयटी कंपन्यांकडून पगारी सुट्या घेण्याबाबत करण्यात येत असलेल्या सक्‍ती संदर्भातील तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. या बाबत कामगार आयुक्‍त, जिल्हाधिकारी आणि कामगारमंत्री यांना सविस्तर निवेदन देणार असून, त्यातून मार्ग काढण्याची मागणी संघटनेकडून करणार आहोत.'' 
- पवनजित माने, अध्यक्ष, महाराष्ट्र विभाग, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज (फाइट) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com