CoronaVirus : भोसरी परिसरात शुकशुकाट; असा मिळाला जनता कर्फ्युला प्रतिसाद

janata curfew get Response In the Bhosari area
janata curfew get Response In the Bhosari area

भोसरी(पुणे) : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने पुकारलेल्या जनता कर्फ्यूमध्ये भोसरीकर आणि इंद्रायणीनगरातील रहिवाशांनी शंभर टक्के प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे भोसरी आणि इंद्रायणीनगरातील नेहमीच गजबज असलेल्या चौकात शुकशुकाट होता. सकाळी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची परिसर स्वच्छ केल्यानंतर जनता कर्फ्यूमुळे परिसर निर्जन झाला होता. अधून-मधून पोलिसांची जीपचा परिसरात सायरनसह फेरफटका दिसत होता. त्याचप्रमाणे पीएमपीएमएलच्या बसच्याही अधूनमधून फेऱ्या दिसत होत्या. 
           
रेल्वे लॉक डाऊन ! देशातील रेल्वे वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद 

भोसरीतील भोसरी-आळंदी रस्ता चौक, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, चांदणी चौक, पीएमटी चौक, पीसीएमटी चौक, लांडेवाडी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा दोन्ही बाजूकडील सेवा रस्ता आदी भाग नेहमीच गजबजलेला असतो. त्याचप्रमाणे इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट, श्री तिरुपती बालाजी चौक, साई चौक, इंद्रायणी चौक आदी परिसर ग्राहक आणि वाहनांच्या वर्दळीने नेहमीच गजबजलेला असतो. मात्र रविवारी (ता. २२) जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे परिसरात शुकशुकाट होता. 
       
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भोसरी आणि इंद्रायणी परिसर स्वच्छ केला. सर्वच दुकाने बंद असल्याने सकाळी सात वाजेपर्यंत काही नागरिकांनी दूधासाठी दुकाने शोधली. मात्र सातनंतर सर्वच परिसरात शुकशुकाट दिसला. पोलिसांची जीप अधूनमधून सायरन वाजवत भोसरी परिसरातून फेरफटका मारत होती. 

Coronavirus : राज्यात वाढतीये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या; एकट्या पुण्यात...

भोसरीतील बीआरटीएस टर्मिनल आणि पीएमपीएमएलच्या बस स्थानकावरून सकाळी काही बस दोन-तीन प्रवाशांसह सोडण्यात येत होत्या. मात्र प्रवाशांची संख्य अगदीच कमी असल्याने दुपारी दोन वाजपर्यंत फेऱ्या मारून आलेल्या बस पीएमपीएमएलच्या सद्गुरु आगारात पाठविण्यात येत होत्या. त्यामुळे दुपारी दोननंतर पीएमपीएमएल आणि बीआरटीएस टर्मिनल बस सेवा प्रवाशांअभावी बंद करण्यात आल्याची माहिती टर्मिनलद्वारे देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com