पुणे शहराला सुरळीत दूध पुरवठ्यासाठी कात्रज डेअरी सुरू राहणार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

पुणे शहराला दुधाची टंचाई भासू नये, यासाठी कात्रज डेअरी सुरु ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.संचारबंदीच्या नियमांचे पालन करत डेअरी नेहमीप्रमाणे चालू राहणार.

पुणे -  पुणे शहराला दुधाची टंचाई भासू नये, यासाठी कात्रज डेअरी सुरु ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे कात्रज परिसर ‘सील’ केला असला तरी संचारबंदीच्या नियमांचे पालन करत डेअरी नेहमीप्रमाणे चालू राहणार असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी गुरुवारी सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने टप्प्याटप्याने शहरातील विविध भाग ‘सील’ करण्यास पुणे पोलिसांनी सुरूवात केली आहे. त्यानुसार गुरूवारी सकाळी कात्रज परिसर ‘सील’ करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील अत्यावश्क सेवांमध्ये येत असलेली दुकानेसुद्धा सकाळी ११ वाजेपर्यंतच चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र कात्रज डेअरी दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती; परंतू राज्य सरकारचा आदेश आणि शहराची दुधाची गरज लक्षात घेता, डेअरी प्रशासनाने पुण्याचे प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी प्रशांत मोहोड यांच्या कानावर ही बाब घातली. शिवाय पोलिसांचा आदेश असला तरी सरकारच्या लेखी आदेशाशिवाय अधिकारी आणि कर्मचारी डेअरी बंद ठेवू शकत नाही, असेही डॉ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करत डेअरी सुरु राहणार आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’चा अवलंब, कमाल पाच लोकांनाच प्रवेश, गर्दी टाळणे आणि डेअरीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या अंगावर निर्जंतुकीकरणाचा स्प्रे मारला जाणार आहे. दरम्यान, सहकारी डेअरी सरकारच्या परवानगीशिवाय बंद करता येत नसल्याचे मोहोड यांनी सांगितले.

Coronavirus : पुढील आदेश येईपर्यंत पुणे मार्केट यार्ड बाजार बंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Katraj dairy milk supply will continue in Pune city

Tags
टॉपिकस