Lockdown : ठेकेदाराने वाऱ्यावर सोडल्याने मजूरांचे हाल.

कृषी महाविद्यालय - पुण्यातील पत्रकारांनी जेवणाची सोय केल्याने मजूरांना काही प्रमाणात मदत होत आहे.
कृषी महाविद्यालय - पुण्यातील पत्रकारांनी जेवणाची सोय केल्याने मजूरांना काही प्रमाणात मदत होत आहे.

औंध - 'हम घर जाना चाहते है साहब, इधर हम अटके हुए रहनेकी वजहसे घरपर सभी चिंता में है और  हमारे पास कोई पैसा भी नही बचा. इधरसे, हमें घर जाने के लिए कोई मदद मिले तो बडी मेहेरबानी होगी " कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळणाच्या सुविधा बंद असल्याने चमडू पासवान आर्त स्वरात पुण्यात अडकून पडल्याने होणारी तगमग व्यक्त करत होता.आठ महिन्यापुर्वी मेट्रोचे काम करायला म्हणून बिहारच्या बेगुसराई जिल्ह्यातील पंचवीस मजूर दिल्लीच्या ठेकेदाराने पुण्यात आणले होते.

कृषी महाविद्यालयाच्या रिकाम्या जागेत झोपड्यांमध्ये त्या मजूरासोबत आपल्या एका मुलासह चमडूही राहत आहे. ठेकेदाराने दिल्लीला जाऊन फोन बंद करुन ठेवल्याने संपर्कही होत नाही, त्यात हाती पैसा नाही, त्यामुळे खाण्यापिण्याची सोय नाही अन लाॅकडाऊन असल्याने बाहेर पडायचा मार्ग नाही. त्यामुळे सगळ्या मजूरांच्या चेह-यावर भीतीसह अस्वस्थता जाणवतेय. कृषी महाविद्यालयाच्या मोकळ्या जागेत राहणारे अल्पशिक्षित व काही निरक्षर मजूर या परिस्थितीने मात्र हतबल झाले आहेत.काही तरी करुन आम्हाला घरी जायची व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी ते करत आहेत. त्यांच्या जेवणाची जबाबदारी पुण्यातील काही पत्रकार मित्रांनी घेतली असून रोज त्यांच्या झोपड्यांवर जाऊन जेवण पुरवले जात आहे. परंतु त्यांचे मन काही या ठिकाणी लागत नसल्याचे सर्वच जण सांगतात. 

तर बाजूलाच काही कोकणातील दापोली येथील एक कुटुंब व विदर्भातील नागपूर, अकोला येथील काही कुटुंंबं मिळून पंचवीसेक जण येथे राहत आहेत. गावी जाता येत नाही त्यामुळे नेमके काय होणार यामुळे ही सारी मंडळी घाबरलेल्या  अवस्थेत आहेत . ठेकेदाराने पैसे न दिल्याने आमच्या खाण्यापिण्याची अडचण तर होतच आहे परंतु लहान मुलांना दुध मिळत  नसल्याने त्यांचेही हाल होत आहेत असे संदीप चव्हाण यांनी सांगितले.यातील सगळे पुरुष गवंडी काम करणारे तर महिला मजूर काम करणाऱ्या आहेत. 

ठेकेदाराने वा-यावर सोडून दिल्याने आमचे हाल होत असून रस्ते मोकळे होऊन कधी एकदा गावी जातोय असे आम्हाला झालंय अशी अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केली. 

प्रतिक्रिया -
१) माझ्या पत्नीसह तीन मुले व एक मुलगी बिहार येथे गावी असून मी एका मुलाला कामासाठी पुण्यात आणले आहे. परंतु या अशा परिस्थितीत आम्ही असल्याने गावाकडे सगळे चिंतेत आहेत तर तिकडे त्यांचे काय होत असेल ही मला चिंता आहे. ठेकेदाराने कुठलेही सहकार्य न केल्याने आम्ही पंचवीस जण इथे अडकून पडले आहोत परंतु किमान जेवणाची तरी सोय काहीजण करत आहेत ही एक आमच्यासाठी जमेची बाब आहे.
- चमडू पासवान, मेट्रो मजूर. 

२) आमचीही तीच अवस्था असून आम्हाला गावी जायची इच्छा आहे परंतु सगळे मार्ग बंद असल्याने नाईलाज आहे. लहान मुलांसह सर्वांनाच इथे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
- संदीप चव्हाण, गवंडी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com