Coronavirus : पुणे : शववाहिकाच्या चालकांसाठी महापालिकेचे 30 पीपीपी किट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

पीएमपीच्या शववाहिकांच्या ताफ्यात सध्या 8 बस आहेत. त्यातील 6 बस कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वाहतुकीसाठी मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन बस अन्य प्रकारच्या आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांसाठी वापरण्यात येत आहेत. या बसच्या चालकांना पीपीपी किट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने सोमवारी 30 किट पीएमपीला उपलब्ध करून दिले आहेत.

पुणे - पीएमपीच्या पुष्पक या शववाहिकांच्या चालकांसाठी 30 पीपीपी किट महापालिकेने प्रदान केले आहेत. पीएमपीकडून शववाहिका सध्या रात्रंदिवस सुरू असून चालकांच्या सुरक्षिततेसाठी हे किट महत्त्वाचे ठरणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीच्या शववाहिकांच्या ताफ्यात सध्या 8 बस आहेत. त्यातील 6 बस कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वाहतुकीसाठी मोफत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन बस अन्य प्रकारच्या आजारांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांसाठी वापरण्यात येत आहेत. या बसच्या चालकांना पीपीपी किट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने सोमवारी 30 किट पीएमपीला उपलब्ध करून दिले आहेत.

त्यामुळे तीन शिफ्टमधील 24 कर्मचाऱयांना त्याचे वाटप करण्यात आ्ले आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. खासगी शववाहिका सध्या उपलब्ध होत नसल्यामुळे पीएमपीच्या शववाहिकांची मागणी पुणे आणि पिंपरी चिचंवडमध्ये सध्या वाढली असून त्यानुसार त्या अहोरात्र उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 020-24503211 किंवा 12 या दूरध्वनी क्रमाकांवर शववाहिका सध्या उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal 30 PPP kits for hearse drivers